आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद बातमी:प्रसिद्ध तेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये होते. रेड्डी हे 74 वर्षांचे होते. तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांनीही रेड्डी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांनी ट्विट करत म्हटले की, 'जयप्रकाश रेड्डी यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने तेलुगू सिनेमा आणि थिएटरने एक रत्न गमावले आहे. अनेक दशकांपासून त्यांनी केलेल्या भूमिकांनी आपल्याला अनेक आठवणी दिल्या आहेत. या दुःखद प्रसंगी मी त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत आहे. मला या घटनेने खूप दुःख झाले आहे.'

जय प्रकाश यांना सहाय्यक भूमिका आणि कॉमेडी रोलसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'ब्रह्मापुत्रुदू' मधून केली होती.यासोबतच त्यांनी प्रेमिचुकुंदम रा, गब्बर सिंह, चेन्नाकेशवारेड्डी, सीथाया आणि टेंपरसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या होत्या. जयप्रकाश रेड्डी अल्लागड्डा जिल्ह्यातील राहणारे होते आणि चित्रपटांमध्ये आपल्या रायलसीमा या खास लहेज्यात बोलण्यामुळे प्रसिद्ध होते.

बातम्या आणखी आहेत...