आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा:हार्ट अटॅकमुळे बाथरुममध्ये कोसळले होते तेलुगु अभिनेते जय प्रकाश रेड्डी; रकुल प्रीत, प्रकाश राज, महेश बाबूसह अनेक कलाकारांनी व्यक्त केला शोक

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 74 वर्षीय जय प्रकाश रेड्डी यांनी आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे अखेरचा श्वास घेतला, ते लॉकडाऊनपासून येथे होते.
  • बालकृष्ण स्टारर 'समरसिम्हा रेड्डी' हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जय प्रकाश रेड्डी यांचे आज सकाळी निधन झाले आहे. 74 वर्षीय रेड्डी यांची हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे प्राणज्योत मालवली. लॉकडाऊनपासून ते घरीच होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयप्रकाश रेड्डी यांना बाथरुममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. तेलुगु सिनेमांचे प्रेक्षक रेड्डी यांना विनोदी अभिनेत्याच्या रुपात ओळखतात.

  • शिक्षकहून बनले होते अभिनेता

रिपोर्ट्सनुसार, जय प्रकाश रेड्डी शिक्षक होते आणि त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी ते गुंटूरमध्ये स्टेज प्ले करायचे. त्यांचा पहिला चित्रपट 'ब्रह्मा पुत्रुदु' हा होता. पण त्यानंतर त्यांना फारसे यश मिळाले नाही आणि त्यांनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली.

जवळपास एक दशकानंतर, त्यांना 'प्रेमिचुकंदम रा' या चित्रपटाद्वारे मोठा ब्रेक मिळाला. पण बालकृष्ण स्टारर 'समरसिम्हा रेड्डी' हा चित्रपट त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. येथून त्यांनी खलनायकाच्या रुपात आपला वेगळा ठसा उमटवला.

'नरसिम्हा नायडू', 'आनंदम', 'निजाम', 'कबड्डी कबड्डी, 'चिन्ना ', 'धरमपुरी ', 'किंग ', 'किक ', 'बिंदास', 'गब्बरसिंह', 'लीजेंड', 'ब्रूस ली: द फाइटर ', 'नेनु राजू नेनु मंत्री' आणि 'प्रेमी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

  • कलाकारांनी व्यक्त केला शोक

तामिळ आणि तेलुगू सिनेमातून बॉलिवूडमध्ये आलेल्या रकुल प्रीत सिंहने ट्विटरवर लिहिले, “ही फार वाईट घटना आहे. मी त्यांच्याबरोबर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. कुटूंबाला माझी सहानुभूती. जय प्रकाश रेड्डी गुरुंच्या आत्म्याला शांती लाभो."

ज्युनिअर एनटीआरने शोक व्यक्त करताना लिहिले, "आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणा-या अभिनेत्याच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटले. आशा करतो की, दिवंगत आत्म्याला शांती मिळेल."

अभिनेता महेश बाबूने लिहिले, "जय प्रकाश रेड्डी यांच्या निधनाबद्दल ऐकून मी स्तब्ध झालोय. ते एक कमालीचे अभिनेते होते. त्यांच्या अनुभवाची शिदोरी कायम जपून ठेवणार. त्यांच्या कुटूंबियांबद्दल आणि प्रियजनांबद्दल मनापासून संवेदना."

जय प्रकाश रेड्डी यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रकाश राज यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांनी लिहिले, "ते एक असे अभिनेता होते, ज्यांनी रुपेरी पडद्यावर आणि रंगमंचावर आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जीव ओतला. त्यांच्या कुटुंबाविषयी माझी सहानुभूती आहे. आमचे मनोरंजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चीफ."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser