आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Jaya Saha Accepts In Her Statement To NCB That She Ordered CBD Oil Online For Shraddha Kapoor, Also Arranged CBD Oil For Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty, Filmmaker Madhu Mantena Verma And Herself.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज चॅटमध्ये नवीन खुलासा:श्रद्धा कपूरसाठी 'सीबीडी' ऑर्डर केल्याची जया साहाची एनसीबीकडे कबुली, नम्रता शिरोडकरसोबतच्या चॅटविषयी विचारणा झाल्यावर म्हणाली - मला काहीही आठवत नाही

मुंबई8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जया साहा सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांची टॅलेंट मॅनेजर होती.
 • जया आणि रियाचे चॅट समोर आल्यानंतरच ड्रग्ज कनेक्शनचा खुलासा झाला.

गेल्या काही दिवसांत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत अनेक मोठी नावे समोर आली आहेत. दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मागील दोन दिवसांच्या चौकशीत सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांची टॅलेंट मॅनेजर जया साहाने अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. श्रद्धा कपूरसाठी ऑनलाईन ऑर्डर देऊन सीबीडी ऑईलची व्यवस्था केली असल्याचे साहाने तपास यंत्रणेला सांगितले आहे.

चौकशीदरम्यान एनसीबीने जयाला श्रद्धासोबतचे तिचे व्हॉट्सअॅप चॅट दाखवत अनेक प्रश्न विचारले. श्रद्धासाठी सीबीडी ऑईसची व्यवस्था केल्याची कबुली जयाने दिली. सीबीडी या ड्रगवर भारतात बंदी आहे.

 • अनेक सेलिब्रिटींना सीबीडी दिल्याची कबुली

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जया साहाने कबूल केले की, श्रद्धा कपूर व्यतिरिक्त ती सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, चित्रपट निर्माता मधु मांटेना वर्मा आणि स्वत:साठी सीबीडी ऑईलची व्यवस्था करीत असे. त्याचवेळी एनसीबीने जयाला नम्रता शिरोडकरसोबत झालेल्या चॅटबद्दल विचारले असता चॅट तिचेच असल्याचे तिने मान्य केले. मात्र त्याबद्दल काहीच आठवत नसल्याचे ती म्हणाली.

यापूर्वी ईडीने रिया चक्रवर्ती आणि जया साहा यांच्यात झालेल्या ड्रग्जबाबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा खुलासा केला होता. ज्यामध्ये जयाने रियाला सुशांतच्या चहा किंवा कॉफीमध्ये काही थेंब टाकण्याचा सल्ला दिला होता. चहामध्ये 4 थेंब घाल आणि त्याला ते प्यायला दे. 30-40 मिनिटांनी त्याचा परिणाम दिसून येईल, असा मेसेज जयाने रियाला केला होता. नंतर या दोघींमध्ये सीबीडी ऑईलसंदर्भात ही चर्चा झाल्याचे समोर आले.

 • एनसीबीने करिश्माला समन्स बजावले

एनसीबीने मंगळवारी दीपिका पदुकोणची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश हिलादेखील चौकशीसाठी बोलावले. मात्र तब्येत बरी नसल्याचे सांगून 25 सप्टेंबरनंतर जबाब नोंदविण्याची विनंती तिने एनसीबीकडे केली आहे. करिश्मा आणि जया साह क्वान या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीत एकत्र काम करतात.

 • अनेक अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर

ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. यामध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, दीया मिर्झा, नम्रता शिरोडकर आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश आहे.

 • बोटमनने सारा, रकुल, श्रद्धा यांचे नाव घेतले होते

चौकशी दरम्यान लोणावळा येथील एका बोटमनने सांगितले होते की, रिया चक्रवर्ती, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग सुशांतबरोबर त्याच्या लोणावळास्थित फार्महाऊसमध्ये पार्टी करायच्या. तिथे झालेल्या पार्ट्यांमध्ये गांजा आणि मद्यपानचा वापर अगदी सामान्य बाब होती, असा खुलासादेखील या बोटमनने केला.

 • सोमवारी दीपिकाचे नाव समोर आले

दीपिका पदुकोणचे नाव सोमवारी ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर आले. दीपिकाची मॅनेजर करिश्मासोबतचे तिचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यावर याचा खुलासा झाला. दीपिकाने चॅटमध्ये करिष्माकडे माल आहे का? अशी विचारणा केली होती. तिने करिश्माकडे हशीश आणि वीडची मागणी केली होती. दोघांमधील हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते.

 • एनसीबी दीपिका, सारा आणि रकुल यांना समन्स बजावू शकते

एनसीबीच्या एका अधिका्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही सर्वप्रथम करिश्मा प्रकाशची चौकशी करू. गरज भासल्यास दीपिका पदुकोणलासुद्धा समन्स पाठवले जाईल. दीपिकाशिवाय अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि सारा अली खान यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...