आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झलक दिखला जा 10:जान्हवी कपूरने केला जबरदस्त बेली डान्स, व्हिडिओ पाहून चाहते झाले इम्प्रेस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिली' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये पोहोचली होती. याचा एक व्हिडिओ कलर्स टीव्हीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी 'नदियों पार' या गाण्यावर जबरदस्त बेली डान्स करताना दिसली. यादरम्यान शोची जज माधुरी दीक्षित तिचे बेली मुव्ह्स बघून खूपच प्रभावित झाली. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर युजर्स जान्हवीच्या डान्सचे कौतूक करत आहेत. जान्हवीचा 'मिली' हा चित्रपट 4 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी कौशलही मुख्य भूमिकेत आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...