आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केला नवा आशियाना:65 कोटी आहे या डुप्लेक्सची किंमत; पार्किंगसाठी देण्यात आले आहेत पाच स्लॉट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच मुंबईतील वांद्रे परिसरात एक डुप्लेक्स खरेदी केला आहे, तिच्या या आलिशान घराची किंमत तब्बल 65 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घरासाठी जान्हवीने 3.90 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरले आहे. हा व्यवहार 12 ऑक्टोबर 2022 रोजी झाला आहे.

जान्हवीला या डुप्लेक्समध्ये मिळाले 5 कार पार्किंग स्लॉट
जान्हवीच्या हा डुप्लेक्सचा कार्पेट एरिया 8,669 स्क्वेअर फूट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या आणि दुस-या मजल्यावर बाग, स्विमिंग पूल अशा सुविधा आहेत. शिवाय तिला पार्किंगसाठी पाच स्लॉट देण्यात आले आहेत.

राजकुमार रावला विकले होते जुने घर
जान्हवी कपूरने या वर्षी जुलैमध्ये तिचे 3456 स्क्वेअर फूट असलेले जुने घर विकले. हे घर तिने अभिनेता राजकुमार रावला 44 कोटींना विकले. तिची ही प्रॉपर्टी जुहू येथे होती. जी तिने डिसेंबर 2020 मध्ये 39 कोटी रुपयांना विकत घेतली होती. जान्हवीने गेल्या 2 वर्षात 3 रिअल इस्टेट डील केल्या आहेत.

जान्हवी लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे.
जान्हवीने शशांक खेतानच्या 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिला आई श्रीदेवीने ट्रेनिंग दिले होते. शूटिंगदरम्यानच जान्हवी कथ्थक शिकली होती. हा चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. दुसरीकडे, जान्हवीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती 'मिस्टर अँड मिसेस माही', 'बवाल', 'तख्त', 'दोस्ताना 2' आणि 'किट्टी' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच तिला 'मिली' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...