आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

न्यू एंट्री:'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं' या मालिकेत जिया चौहानची एंट्री, साकारणार देवी पार्वतीची भूमिका 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'चे नवीन एपिसोड्स 13 जुलै पासून रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहेत.
Advertisement
Advertisement

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जिया चौहान लवकरच अँण्‍ड टीव्‍हीवरील 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये पार्वतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेच्‍या माध्‍यमातून ती पौराणिक शैलीमध्‍ये पुनरागमन करत आहे आणि तिला या मालिकेचा भाग असण्‍याचा खूप आनंद झाला आहे. 

देवी पार्वतीची भूमिका साकारण्‍याबाबत उत्साहित असलेली जिया चौहान म्‍हणाली, मला पुन्‍हा एकदा पौराणिक शैली साकारण्‍याचा आनंद झाला आहे. मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये मी दीर्घकाळानंतर देवी पार्वतीची भूमिका साकारणार आहे. मी ही मालिका पाहत आले आहे आणि मला अशा प्रकारची प्रबळ भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली असल्‍यामुळे खूपच चांगले वाटत असल्याचे जियाने सांगितले.  

ती पुढे म्हणाली, या शैलीपासून काहीसे दूर राहिल्‍यामुळे मी भाषाशैली आत्‍मसात करण्‍यासाठी भक्‍तीमय कथा वाचत आहे आणि भूमिकेमध्‍ये संयमता आणण्‍यासाठी वारंवार चिंतन देखील करत आहे. हे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे, पण पडद्यावर देवीची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली असल्‍यामुळे समाधान देखील वाटत आहे. मी नियमित सरावासह पुन्‍हा एकदा या शैलीमध्‍ये निपुण होण्‍याचा प्रयत्‍न करत आहे, असे जियाने सांगितले. 

मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'च्‍या आगामी नवीन एपिसोड्समध्‍ये सिंघासन सिंग आणि संतोषी माँची निस्‍सीम भक्‍त स्‍वाती यांच्‍यामधील अत्‍यंत तणावपूर्ण क्षण पाहायला मिळणार आहेत. सून स्‍वातीला घराबाहेर काढण्‍याचा निर्धार केलेला सिंघासन सिंग वरदान मिळवण्‍याच्‍या उद्देशाने संतोषी माँ व्रत करण्‍यासाठी त्‍याच्‍या कुटुंबासोबत संपूर्ण समुदायाला एकत्र आणणार आहे. यामुळे संतोषी माँ धर्म-अधर्म, तिची निस्‍सीम भक्‍त स्‍वाती आणि दुष्‍ट सिंघासन सिंग यांच्‍यामधून निवड करण्‍याच्‍या दुविधेमध्‍ये सापडणार आहे.  

Advertisement
0