आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खान आत्महत्या प्रकरण:8 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिया खान मृत्यू प्रकरणाची सुनावणी आता होणार CBI न्यायालयात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2013 मध्ये जियाने केली होती आत्महत्या

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या आठ वर्षांनी आता या प्रकरणाची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात होणार आहे. जिया खानच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाइड नोटवरून अभिनेता सुरज पांचोलीला आरोपी मानण्यात आले. आतापर्यंत सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय न्यायालयात वर्ग केले.

काय म्हणाले सूरज पांचोलीचे वकील
यावर प्रतिक्रिया देताना सूरज पांचोलीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, सत्र न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय न्यायालयात वर्ग केल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हे
प्रकरण लवकरात लवकर पुढे यावर सहा महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा, अशी आम्ही यापूर्वी अनेकदा विनंती केली होती. पण आता हे प्रकरण सीबीआय कोर्टात गेल्यामुळे तिथे अर्ज करून दैनंदिन आधारावर हा खटला चालवण्यासाठी अर्ज करू.

2013 मध्ये जियाने केली होती आत्महत्या
जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली होती. जियाची आई राबिया यांना जिया जुहूस्थित घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. मृत्यूसमयी जिया केवळ 25 वर्षांची होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेंड सूरज पंचोलीला 10 जून 2013 रोजी अटक करण्यात आली होती. सध्या सूरज जामिनावर बाहेर आहे.

बातम्या आणखी आहेत...