आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Jimmy Shergill, Trapped In Bad Shooting By Ludhiana Night Curfew, Arrested Along With 3 Others; A Day Ago, Even After Paying The Challan, The Senses Did Not Come.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारीच्या काळात अभिनेत्याचे बेजबाबदारपणाचे वर्तन:नाइट कर्फ्यूत शूटिंग केल्याने अडकला जिमी शेरगिल, अन्य 3 जणांसह झाली अटक; एका दिवसाआधीच पोलिसांनी ठोठावला होता दंड

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोरोना महामारीमुळे पंजाबच्या लुधियाना येथे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या संक्रमणामुळे येथे नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिल कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने वाईटरित्या अडकला होता. कोरोना प्रोटोकॉल तोडल्यामुळे पोलिसांनी जिमीसह 3 जणांना अटक केली आहे. या सर्वांविरोधात सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे, महामारी रोग अधिनियम आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

एसआय मनिंदर कौर यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून जिमी शेरगिलची टीम लुधियाना येथील आर्या स्कूलमध्ये पंजाबी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. यामुळे, शाळेच्या इमारतीचे रूपांतर सत्र कोर्टाच्या सेटमध्ये करण्यात आले होते. सोमवारी पोलिसांना माहिती मिळाली की येथे फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. शिवाय सेटवर कुणीही मास्क घालत नाहीये. यामुळे एसीपी सेंट्रल वरियम सिंह यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने चित्रपटाच्या टीमला दंड ठोठावला होता.

असे असूनही टीमने पुन्हा नियमांचे उल्लंघन केले. मंगळवारी उशिरा पोलिसांना नाइट कर्फ्यू दरम्यान शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. इतकेच नाही तर सेटवर जवळपास दीडशे लोकांचा क्रू उपस्थित असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी पुन्हा कारवाई केली असता, त्यांना मिळालेली माहिती बरोबर असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ अभिनेता जिमी शेरगिलसह चार जणांना अटक केली. यातील उर्वरित जणांची नावे मुंबईतील वर्सोवा पंच मार्ग स्थित पार्क प्लाझा रहिवासी ईश्वर निवास, सिओडा चौक रहिवासी आकाश दीपसिंग, झिरकपूर येथील मधुबन होम येथील रहिवासी मनदीप ही आहेत. या सर्वांविरोधात सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे, महामारी रोग अधिनियम आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...