आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:कारकीर्दीच्या सुरूवातीला एकता कपूरचे अनेक शोज झाले होते फ्लॉप, जितेंद्र यांनी सांगितले मुलीने बनवलेले शो बघणे का बंद केले होते

मुंबई (किरण जैन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जितेंद्र म्हणाले - एकताचे शो फ्लॉप व्हायचे तरीही मी तिचे कौतुक करायचो.

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी ‘बारिश 2’ या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश केला आहे. बर्‍याच दिवसांनी पुनरागमन केल्याबद्दल दिव्य मराठीने जितेंद्र यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी त्यांची मुलगी एकता कपूरच्या कामाशी संबंधित अनेक रंजक गोष्टीही शेअर केल्या आहेत.

  • एकताचे शो बघत नव्हते जितेंद्र

मी एकताला नाही म्हणू शकत नाही. जेव्हा ती मला म्हणाली, पापा, तुम्हाला हा शो करावा लागेल, तेव्हा मी लगेचच होकार दिला. मी एकताचे शो बघत नाही.  बर्‍याच वर्षांपासून मी तिचे कार्यक्रम पाहिले नाहीत. यामागे एक मोठे कारण आहे. सुरुवातीला मी एकताचा प्रत्येक कार्यक्रम बघायचो आणि तिच्या प्रत्येक कामाचे कौतुक करायचो. जवळपास 23 -24 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. जेव्हा एकताने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी तिचे काही कार्यक्रम यशस्वी झाले नव्हते. तरीदेखील मी तिचे कौतुक करायचो. आता आपल्या मुलीच्या कामावर टीका कशी करावी? एकताला समजले की मी तिच्या कामाबद्दल निष्पक्ष आहे. त्यानंतरच मी तिचे शो पाहणे बंद केले. मी 'बारिश'च्या पहिल्या सीझनचे काही भाग पाहिले होते आणि मला ते खूप आवडले. शोला 'हो' म्हणायलादेखील हे एक कारण होते.

न्यूकमर असल्यासारखे वाटत आहे:

मी या शोबद्दल खूप घाबरलो होतो. मला भीती वाटत होती की लोकांना वाटू नये की मी अभिनय विसरलोय. बर्‍याच वर्षांनंतर, कॅमे-यासमोर होतो, वरुन सर्व संवाद बरेच लांब होते आणि या वयात ओळी लक्षात ठेवणे फार कठीण आहे. खरं सांगायचं तर मी विसरलो होतो की मी कधीकाळी अभिनेता होतो. इंडस्ट्रीत एक न्यूकमर आल्यासारखी भावना निर्माण झाली होती. जेव्हा मी सेटवर गेलो, तेव्हा  मी थोडासा काळजीत होतो, पण टीमने मला खूप कम्फर्टेबल केले. खरं सांगायचे तर मी हे सर्व फक्त एकतासाठी केले. सध्या मी बांधकाम व्यवसायात लक्ष केंद्रित करत आहे.

आता तो जोश आणि उत्साह नाही:

एक काळ असा होता की चित्रपटांव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात काहीही नव्हते. त्यावेळी मी माझ्या घरातील सदस्यांकडेही लक्ष देऊ शकत नव्हतो. माझी मुले - एकता आणि तुषार कधी मोठे झाले तेही  मला समजले नाही.  एक काळ असा होता की माझे चित्रपट हिट असायचे आणि नंतर एक वेळ अशी आली की माझे चित्रपट चालणे बंद झाले. पायरेसीमुळे लोकांनी थिएटरमध्ये येणे कमी केले. त्यामुळे चित्रपट चालत नव्हते. म्हणूनच मी चित्रपट करणे कमी केले. त्यानंतर मला कोणतीही मोठी ऑफर मिळाली नाही, कदाचित लोकांना वाटले असेल की मी चित्रपट करणे बंद केले. पण तसे नव्हते. माझ्या वयाचे अनेक कलाकार आजही कार्यरत आहेत आणि खूप चांगले काम करत आहेत पण मला आता काम करण्याची इच्छा नाही. माझ्यात पुर्वीसारखा जोश आणि उत्साह राहिला नाही.

माझ्या मुलांना वेळ देता आला नाही:

ज्याप्रमाणे मी माझ्या नातवंडांना वेळ देत आहे किंवा आज मी त्यांच्याबरोबर जे जीवन जगतोय, तसे मी माझ्या मुलांसोबत जगू शकलो नाही. मला वाईट वाटतं की मी त्या सुवर्ण दिवसांना गमावले. जो वेळ एकता आणि तुषारला द्यायला हवा होता, तो मी त्यांना देऊ शकलो नाही. मी आता एकता आणि तुषारच्या मुलांसमवेत वेळ घालवून ती पोकळी भरून काढत आहे.  

मला 'द कपिल शर्मा शो' पाहणे खूप आवडते:

सध्या मी टेलिव्हिजनवर बरेच जुने चित्रपट पहात आहे. जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मी दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहतो, मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मी काही जुने टीव्ही शो देखील पाहतोय. मला 'द कपिल शर्मा शो' आवडतो, विशेषत: त्याचे जुने भाग. या शोमुळे वातावरण खूपच हलके होते.

मी फार धार्मिक व्यक्ती नाही:

मला 'रामायण' किंवा 'महाभारत' सारखे पौराणिक शो पाहणे आवडत नाही. मी इतका धार्मिक व्यक्ती नाही. मला त्याची कहाणी माहित आहे. पण मला ते स्क्रीनवर पाहण्याची आवड नाही.

बातम्या आणखी आहेत...