आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहृतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन स्टारर 'जोधा अकबर' या चित्रपटाच्या रिलीजला आज (15 फेब्रुवारी) 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 2008 मध्ये याच दिवशी प्रदर्शित झाला होता. जोधा अकबरचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. या चित्रपटातील हृतिकच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. चित्रपटाला 14 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हृतिकने आपला अनुभव शेअर केला आहे.
'जोधा अकबर'मधून मला खूप काही शिकायला मिळाले - हृतिक
या चित्रपटाबाबत हृतिक म्हणाला, "सांगानेरमध्ये जोधा अकबर या चित्रपटासाठी शूटिंग करणे हा एक असा अनुभव होता जो मी कधीही विसरु शकणार नाही. घरापासून दूर असूनदेखील मला घरी असल्यासारखे वाटले आणि तिथे शूटिंग करताना आम्ही इतर जगापासून वेगळे झालो होतो. मी भाग्यवान होतो म्हणून त्या शहराच्या संस्कृतीचा आणि कलात्मक सौंदर्याचा आस्वाद घेण्याची संधी मला मिळेल.'
हृतिक पुढे म्हणाला, 'मला तिथल्या स्थानिक लोकांनाही भेटण्याची संधी मिळाली, जे सेटवर मोठ्या संख्येने भेट देत असत. त्यांनी आमच्यावर भरभरुन प्रेम केले. या पीरियड ड्रामासाठी मला उर्दू भाषेवर जास्त काम करावे लागले आणि अॅक्शन सीक्वेन्ससाठी तलवारबाजीचे कौशल्य देखील शिकावे लागले... जोधा अकबर हा चित्रपट एक अभिनेता म्हणून निश्चितच माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव होता."
हृतिकचे आगामी प्रोजेक्ट
हृतिकच्या वाढदिवशी त्याच्या बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. यासोबत तो दीपिका पदुकोणसोबत 'फायटर' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.