आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी सिक्वल चित्रपट:'एक व्हिलन रिटर्न'मध्ये झळकणार जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आगामी सिक्वल चित्रपटातही दिसणार हटके कास्टिंग

2014 मध्ये प्रर्दशित झालेल्या एक व्हिलनचा आगामी स्वीक्वल 2022 मध्ये रिलीज होण्यासाठी तयार असून आताच त्याचा पहिला लूक जारी करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेट संदर्भांत घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 मध्ये रिलीज होणार आहे. पहिल्या भागात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. पण, आता याच्या सिक्वलमध्ये जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर लीड रोलमध्ये आहेत. या चित्रपटाप्रमाणेच इतर अनेक हीट चित्रपटांचे सिक्वल येणार असून, यातील स्टारकास्टमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.

भूल भुलैया 2

कार्तीक आर्यन आणि कियारा आडवाणी लवकरच प्रियदर्शनच्या आयकॉनिक हॉरर कॉमेडी भूल भुलैयाच्या सिक्वलमध्ये झळकणारआहेत. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भुल भूलैयामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाहीनी आहुजा मुख्य भूमिकेत होते. पण आता येणाऱ्या याच्या सिक्वलमध्ये कार्तीक आर्यन, कियारा आडवाणी, तबू, परेश रावल, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि नलनेश नील पाहायला मिळतील.

दोस्ताना 2

करण जोहरच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेला दोस्ताना हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यात प्रिंयका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहनने मुख्य भूमिका साकारली होती. यावर्षी चित्रपटाचा सिक्वल रिलीज होणार असून, त्यात जान्हवी कपूर, कार्तीक आर्यन आणि लक्ष लालावानी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला हॉलीवुड डायरेक्टर कॉलिनने दिग्दर्शित केले असून धर्मा प्रॉडक्शनव्दारे निर्मीत केले जाणार आहे.

हंगामा 2

हंगामा 2 या येणाऱ्या आगामी चित्रपटाची शुटिंग आताच पुर्ण झाली असून, यात शिल्पा शेट्टी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहीट कॉमेडी ड्रामा फिल्म हंगामाचा सिक्वल आहे. हंगामामध्ये रिमी सेन, आफताब शिवदासनी, अक्षय खन्ना, परेश रावल, शोमा आनंद आणि राजपाल यादव लीड रोलमध्ये होते. परंतू आता याच्या सिक्वलमध्ये जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रनिता सुभाष, शिल्पा शेट्टी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

बंटी आणि बबली 2

आगामी क्राईम कॉमेडी चित्रपट बंटी आणि बबली 2 हा 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंटी आणि बबलीचा सिक्वल आहे. चित्रपटात सैफ अली खान आणि रानी मुखर्जी प्रमुख भूमिकेत असून, सिंद्धात चतुर्वेदी आणि न्यूकमर शरवरी वाघ पहायला मिळतील. हा चित्रपटाला 2020 मध्येच प्रदर्शित होणार होता, पण कोरोना संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आला.

बधाई दो

भूमी पेडनेकर आणि राजकुमार रावने काही महिण्यांपूर्वी बधाई दो या चित्रपटाच्या सिक्वलची शूटिंग सुरू केली असून, हा चित्रपट 2018 मधल्या बधाई हो चा सिक्वल आहे. आधीच्या चित्रपटात आयुष्यमान खुराना आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते.

बातम्या आणखी आहेत...