आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:जॉन अब्राहम आणि दिशा पाटनीने 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या चित्रीकरणाला केली सुरुवात, रितेश-सिद्धार्थ-श्रद्धा नव्हे तर आता हे कलाकार झळकणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 फेब्रुवारी 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला एक व्हिलन हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका होत्या. अॅक्शन, रोमान्स, ड्रामा यांचे मिश्रण असलेला हा चित्रपट मोहित सुरीने दिग्दर्शित केला होता तर एकता आणि शोभा कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे 'एक व्हिलन रिटर्न्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रितेश, सिद्धार्थ किंवा श्रद्धा यांच्यापैकी कुणीही दिसणार नाहीये, तर संपूर्ण नवीन स्टारकास्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

अभिनेता जॉन अब्राहम, अर्जून कपूर, अभिनेत्री दिशा पटनी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि गुलशन कुमार टी सिरीज यांची असून दिग्दर्शन पहिल्या भागाचे दिग्दर्शक मोहित सुरीच करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. जॉन आणि दिशा यांनी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे. याची माहिती दिशाने सोमवारी सोशल मीडियावरुन दिली आहे. फोटोत दिशाने एक व्हिलन रिटर्न्स लिहिलेली हुडी घातलेली दिसतेय. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'And here we go.'

दुसरीकडे जॉननेही आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या टीमसोबतचा फोटो शेअर करुन 'आणि सुरुवात झाली...' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

विशेष म्हणजे जॉनने 11 फेब्रुवारी रोजी चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख घोषित केली होती. आजपासून 365 दिवस म्हणजे 11 फेब्रुवारी 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे या चित्रपटाच्या पोस्टरवरून समोर आले होते.

या चित्रपटातील कलाकारांचा लूक, कथा, पटकथा, पहिल्या चित्रपटापेक्षा यात काय वेगळं आहे याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...