आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूडचा डॅशिंग ॲक्शन हिरो जॉन अब्राहम देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. जॉनसोबत त्याची पत्नी प्रिया देखील कोविड संसर्गाची शिकार झाली आहे. जॉन आणि प्रिया दोघांचेही लसीकरण झाले होते आणि त्यांची लक्षणे सौम्य असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की, "मी 3 दिवसांपूर्वी कोणाच्या तरी संपर्कात आलो होतो, त्यानंतर मला कळले की मी कोविड पॉझिटिव्ह आहे. प्रिया आणि मी दोघेही कोविड पॉझिटिव्ह झालो आहोत. आम्ही कोणाच्या संपर्कात येऊ नये म्हणून आम्हाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आम्ही दोघांनीही लसीकरण केले असून आम्हाला कोविडची सौम्य लक्षणे आहेत. कृपया स्वतःची काळजी घ्या, निरोगी आणि सुरक्षित रहा."
जॉनला संसर्ग झाल्याची बातमी पसरताच त्याचे चाहते त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर, चाहते त्याला सतत त्याच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत असून त्याला लवकर बरे होण्यासाठी मॅसेज करत आहेत. मात्र, त्याचे लक्षणे सौम्य असल्याने ही दिलासादायक बाब आहे. काही दिवसांपूर्वी जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉनने तिहेरी भूमिका साकारली होती. काही दिवसांतच त्याचा आणखी एक चित्रपटही रिलीजसाठी सज्ज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.