आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे जॉन:5 हजार Sq. फूटमध्ये आहे जॉन अब्राहमचे आलिशान घर, बघा 'विला इन द स्काई'चे खास फोटो

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॉनचे हे आलिशान घर 14 महिन्यांत तयार झाले होते.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत.

17 डिसेंबर 1972 रोजी कोच्चीत जन्मलेल्या जॉनने मॉडेलिंग क्षेत्रातून करिअरची सुरुवात केली होती.

मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर त्याने 2003 मध्ये 'जिस्म' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.

इंडस्ट्रीत 13 वर्षांपासून अॅक्टिव असलेला जॉन 5000 Sq. ft मध्ये असलेल्या 'विला इन द स्काई' या त्याच्या लॅव्हिश डुप्लेक्समुळेही नेहमीच चर्चेत असतो.

सुंदर घराचा मालक आहे जॉन
जॉन एका सुंदर आशियानाचा मालक आहे. मुंबईतील वांद्रा बँड स्टँड या परिसरात असलेल्या त्याचे घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे.

या घराचे इंटेरियर जॉनचे वडील अब्राहम जॉन आणि भाऊ एलनने केले आहे.

जॉनचे हे घर पाच हजार चौ. फुटात असून दोन मजली आहे.

घरातील बेडरुम, किचन, ड्रॉईंग रुम, डायनिंग रुम आणि हॉलची छायाचित्रे बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज लावला जाऊ शकतो.

त्याच्या घरातून समुद्र दिसतो. या घराच्या डिझाइनसाठी 14 महिन्यांचा काळ लागला होता.

बातम्या आणखी आहेत...