आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेलर आउट:'बंदूक तो सिर्फ शौक के लिए रखता हूं... डराने के लिए सिर्फ नाम ही काफी है... ', बघा जॉन अब्राहमच्या 'मुंबई सागा'चा जबरदस्त ट्रेलर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रेलरच्या सुरुवातीलाच जॉन अब्राहमचा बेधडक अंदाज पाहायला मिळतोय.

अभिनेता जॉन अब्राहम, इमरान हाश्मी आणि काजल अग्रवाल स्टारर मुंबई सागा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला. या अ‍ॅक्शन-पॅक ट्रेलरमध्ये जॉन आणि इमरान यांचा जबरदस्त अंदाज बघायला मिळतोय. चित्रपटात जॉन गुंडाच्या भूमिकेत आहे, तर इमरानने पोलिसाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री काजन अग्रवाल जॉनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

जॉनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. 'बंदूक तो सिर्फ शौक के लिए रखता हूं... डराने के लिए सिर्फ नाम ही काफी है... ', असे कॅप्शन त्याने दिले आहे. ट्रेलरमध्ये अनेक लक्ष वेधून घेणारे संवाद आहेत.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच जॉन अब्राहमचा बेधडक अंदाज पाहायला मिळतोय. अमर्त्य राव हे जॉनच्या भूमिकेचे नाव असून तो मुंबईतील विक्रेत्यांकडून हप्ता मागणाऱ्यांच्या विरोधात लढताना दिसतोय. अमर्त्य रावच्या मागवर असलेल्या पोलिसाच्या भूमिकेत इमरान हाश्मी झळकतोय. यासोबत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुनिल शेट्टीदेखील एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसतोय.

'मुंबई सागा'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात आपल्या चाहत्यांसह सेल्फी घेताना जॉन
'मुंबई सागा'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात आपल्या चाहत्यांसह सेल्फी घेताना जॉन

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी जॉनने आपल्या अ‍ॅक्शन स्किल्सविषयी सांगितले, 'काही कलाकारांना नृत्य करणे पसंत असते. माझ्यासाठी अ‍ॅक्शनच माझा डान्स आहे. अ‍ॅक्शन माझ्यासाठी एखादे आयटम साँग करण्यासारखे आहे.'

'मुंबई सागा'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात जॉन आणि इमरान हाश्मी
'मुंबई सागा'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात जॉन आणि इमरान हाश्मी

संजय गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जॉन, इमरान आणि काजल यांच्यासह सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, रोहित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'मुंबई सागा' हा गँगस्टर ड्रामा येत्या 19 मार्चला चित्रपटगृहात धडकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...