आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने 'अटॅक' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका पत्रकाराला चक्क मूर्ख म्हटले आहे. इतकेच नाही तर या पत्रकाराला अंकल म्हणत डोकं घरी ठेऊन आलात काय? अशा शब्दांत जॉनने सुनावले. झाले असे की, जॉन अलीकडेच त्याच्या आगामी अटॅक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याला त्याच्या चित्रपटातील अवास्तव अॅक्शन सीन्सवर प्रश्न केला, यावरुन चिडून त्याने पत्रकाराला खडसावले.
पत्रकाराने जॉनला चित्रपटातील अवास्तव अॅक्शन सीन्सवर प्रश्न विचारला
पत्रकाराने जॉनला विचारले, 'तुझ्या चित्रपटांमध्ये अॅक्शनचा ओव्हरडोस असतो. जोपर्यंत तू चार-पाच लोकांशी भांडतो तोपर्यंत ठिक आहे. पण एकटा 200 लोकांशी लढताना, बाईक्स उचलून फेकताना आणि हेलिकॉप्टर हातांनी थांबवताना पाहिल्यावर ते एक प्रेक्षक म्हणून पटत नाही.'
पत्रकार जॉनच्या चित्रपटांबद्दल आपले मत मांडत असताना जॉनने त्याला मध्येच थांबवत, 'तुम्ही 'अटॅक' चित्रपटाबद्दल बोलत आहात का?, असे विचारले. यावर पत्रकार म्हणाला, 'हा प्रश्न तुमच्या 'सत्यमेव जयते' चित्रपटासाठी होता.' हे ऐकून जॉन म्हणतो, 'सॉरी, पण इथे मी 'अटॅक'बद्दल बोलायला आलोय, जर तुम्हाला यात काही समस्या असेल तर मी काहीच करु शकत नाही.'
जॉनने पत्रकाराला म्हटले निराश
तुझ्या चित्रपटांमधील अॅक्शन सीन्स हे प्रेक्षकांना खरे वाटत नाही, असे तो पत्रकार पुढे म्हणतो. त्यावर पुन्हा जॉन त्याला म्हणतो, “मला माफ कर” आणि त्याच्या सहकलाकारांकडे वळून पत्रकाराबद्दल टिप्पणी करताना म्हणतो, 'बिचारा, मला वाटते की तो स्वत: खूप निराश आहे.'
फिटनेसच्या बाबतीत आणखी एका प्रश्नाचे उत्तर देताना जॉन म्हणाला, 'शारीरिक फिटनेसपेक्षा मी मानसिक फिटनेसकडे जास्त लक्ष देतो, कारण मला अशा मूर्ख प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. काही लोकं खरंच मूर्ख आहेत. सॉरी सर, तुम्ही डोकं घरी ठेवून आलात वाटतं. मी तुमची माफी मागतो. सर्वांच्या वतीने, मी तुमची माफी मागतो. कदाचित पुढच्या वेळी तुम्ही चांगले प्रश्न विचारू शकाल.' यावेळी जॉनने पत्रकाराला ‘अंकल’ असेही म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.