आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता या चित्रपटाच्या सेटवरुन एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन अब्राहमची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे. त्याचवेळी, दुसर्या भूमिकेत तो शत्रूंचा नायनाट करताना दिसणार आहे. अशा प्रकारे जॉन सत्याग्रह आणि हिंसा या दोन्ही द्वारे भ्रष्टाचा-यांना धडा शिकवणार आहे. चित्रपटात जॉनचा अॅक्शन अवतार बघायला मिळणार आहे.
10-12 किलो वजन कमी केले
सूत्रांनी सांगितल्यानुसार, जॉन या चित्रपटासाठी लीन फिजिक ठेवले आहे. यासाठी त्याने त्याचे वजन 10 ते 12 किलोपर्यंत कमी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉनने ट्रकचा टायर फाडला होता. तर आता दुस-या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात तो 50 गुंडांसोबत एकटा लढताना दिसेल.
क्लायमॅक्सच्या अॅक्शन सीन्सची लांबी वाढवली
क्लायमॅक्सच्या अॅक्शन सीन्सची लांबी वाढविली गेली आहे. याचे शूटिंग मागील पंधरवड्यापासून मुंबईत सुरू आहे आणि 21 जानेवारीला ते पूर्ण होईल. लखनौ शेड्यूलमध्ये बरेच अॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यात आले आहेत. विशेषत: मलिहाबादच्या शेतात अॅक्शन सीन्सची शूटिंग करण्यात आली आहे.
चित्रपटात दमदार संवाद
दिग्दर्शक मिलाप झावेरींच्या या चित्रपटात दमदार संवाद असणार आहेत. जॉनचे बहुतेक संवाद हे रायमिंगमध्ये आहेत. डीओपी टीममधील एका सदस्याने सांगितले की, "एका दृश्यात एक मुस्लिम महिला पेन्शन घ्यायला येते. तिच्या हातात कुराण आहे. परंतु विभागातील कर्मचारी तिला पेन्शन देण्यास नकार देतात आणि तिचा हाकलून देतात. तेव्हाच बॅकग्राउंडमध्ये तिरंगा फडफडतो आणि जॉनची एंट्री होते. तो भ्रष्ट कर्मचार्यांना धडा शिकवतो. तेव्हा ती मुस्लिम महिला नमाज अदा करते.' अॅक्शनची ट्रीट असलेला 'सत्यमेव जयते 2' हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.