आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT पदार्पणावर 'अटॅक' स्टारची रिअ‍ॅक्शन:जॉन अब्राहम म्हणतो - 'मी मोठ्या पडद्याचा हीरो आहे, सिंपल.. त्यामुळे वेब सीरिज बनवण्याचा प्रश्नच येत नाही'

ज्योती शर्मा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटासाठी कुटुंबाकडून नव्हे तर अनोळखी लोकांकडून फीडबॅक घेतो
  • चित्रपटातील एखाद्या दृश्यावर जेव्हा समाधानी नसतो तेव्हा प्रचंड मेहनत घेत रिशूट करतो

अभिनेता जॉन अब्राहम ‘अटॅक’ चित्रपटामुळे खूप उत्साहित आणि आत्मविश्वासी आहे. हा चित्रपट 1 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. जॉनने चित्रपट आणि आपल्या करिअरविषयी चर्चा केली...

  • ‘अटॅक’ या विषयावर वेब सीरिज बनवता आली असती, मग चित्रपट का ?

मी मोठ्या पडद्याचा हीरो आहे, सिंपल.. त्यामुळे वेब सीरिज बनवण्याचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या प्रेक्षकांना फक्त 299 मध्ये उपलब्ध झालो, ते माझा चित्रपट आयपॅडवर पाहतील, त्यांना जेव्हा बाथरुम जायचे असेल तर ते बंद करून जातील, असले प्रकार मला पटत नाहीत. मी एक मोठ्या पडद्याचा हीरो आहे. मला मोठ्या पडद्यावर येणे चांगले वाटते. माझ्या मते, काही कलाकार फक्त मोठ्या पडद्यासाठी बनलेले असतात. मी त्यापैकी एक आहे, असे मला वाटते. गर्व झाला म्हणून मी म्हणत नाही किंवा मी कुणाचा अपमानही करत नाही, पण माझ्या बाबतीत मी असाच विचार करतो. ओटीटीवर सध्या चांगला कंटेंट येत आहे. मात्र मी एक अभिनेता म्हणून तेथे दिसणार नाही.

  • चित्रपटाच्या कथेमागची कथा काय?

अमेरिकेत मी एका मुलाला पाहिले, त्याचे नाव निथन कॉपलँड आहे. त्यावरुन मला ‘अटॅक’ चित्रपटाचा विषय सुचला. त्याच्या मेंदुची सर्जरी झाली आहे, त्यात कॉम्प्यूटरची चिप लावण्यात आली आहे. तो सैनिक होता, त्याला हातपाय सुद्धा हालवता येत नव्हते, तो व्हिल चेअरवर बसलेला असायचा.

  • चित्रपटाचे दृश्य संपादनाच्या वेळी पुन्हा शूट केले का ?

'अटॅक’मध्ये तसे झाले नाही मात्र मी माझा एखादा चित्रपट पाहतो, तेव्हा मला एखादे दृश्य खटकले किंवा चित्रपट स्लो वाटला तेव्हा मी दिग्दर्शकाला सांगून तो री-शूट करायला लावतो आणि त्यावर दुप्पट मेहनत करुन चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात तर आम्ही कोणतेही दृश्य री-शूट करत असतो, मात्र आपण आयुष्यात जे करतो त्यासाठी आपल्याला फक्त एकच टेक भेटत असतो त्यामुळे प्रत्येकाने याची जाणीव ठेवावी.

  • जे एंटरटेन्मेंटला 10 वर्षे झाली आहेत, निर्माता म्हणून त्यात काही बदल करणार आहेस का?

'अटॅक’ आमच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे, तो आम्ही वेगळ्या प्रकारे बनवला आहे. या चित्रपटाचे संगीत आधी बनले होते, त्यानंतर पुढे काम करण्यात आले. शाश्वत सचदेवने चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यामुळे तेदेखील एका प्रकारे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाचे साउंड डिझायनर अश्वदीप दा यांनी माझ्यासोबत 'मद्रास कॅफे’मध्ये काम केले आहे. 'लक्ष्य'सारखे तरुण दिग्दर्शक चित्रपट निर्मितीची पद्धत बदलत आहेत. बदल घडवण्याचा जो प्रश्न आहे, तो तुम्हाला मोठे निर्माते, दिग्दर्शक यांना विचारायला हवा, जे मोठे चित्रपट बनवतात.

  • एखादा चित्रपट बनवल्यानंतर कुटुंब किंवा मित्रांकडून प्रतिक्रिया घेतोस का ?

कुटुंबाकडून फीडबॅक घेत नाही मात्र वेगवेगळ्या लोकांकडून नक्कीच जाणून घेत असतो. त्यांच्याकडून आपल्या चित्रपटाचा फीडबॅक जाणून घेतो. चित्रपट एडिट-रीएडिट केला जातो. सर्वांच्या सूचना ऐकतो, त्यांनतर किती बदल करायचा त्यावर विचार करतो. माझे पूर्ण कुटुंब चित्रपट पाहते. ते प्रतिक्रिया आणि सल्लाही देतात. मला आठवतेय, माझ्या वडिलांनी माझा एक चित्रपट पाहिला होता, त्यानंतर त्यांनी मला विचारले होते, तू हा चित्रपट का निवडलास ? मी त्या चित्रपटाचे नाव घेऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...