आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा परिणाम:जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते-2’ आणि ‘मुंबई सागा’चे शूटिंग पुढे ढकलण्यात आले, हैदराबादऐवजी आता मुंबईत होणार शूटिंग

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मुंबई सागा’ची शूटिंग टाळण्याचा परिणाम सरळ 'सत्यमेव जयते-2' वर झाला.

.

अभिनेता जॉन अब्राहमच्या दोन चित्रपटांचे शूटिंग दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आले. ते दोन चित्रपट ‘सत्यमेव जयते-2’ आणि ‘मुंबई सागा’ आहेत. ‘मुंबई सागा’ साठी पूर्ण टीमही 15 जुलैनंतर हैदराबादला जाणार होती. तिथे रामोजी फिल्मसिटीमध्ये शूटिंग करण्याचे नियोजन होते. तिथे जाण्याऐवजी मुंबईमध्येच ते लोकेशन शोधत आहेत. या चित्रपटाचे 10 ते 12 दिवसांचे काम बाकी आहे. ते सर्वच ‘अॅक्शन’ आणि ‘टॉकी’ सिक्वेंस आहेत. हैदराबादमध्ये किंवा मुंबईत शूटिंग होणार याची सगळे वाट बघत आहेत. 15 जुलैला हैदराबादला जावून सगळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परत येणार होते. आता मुंबईची ही तारीख पुढे जाऊन 15 ऑगस्ट झाली आहे.

यामुळे 'सत्यमेव जयते 2' मध्ये टाकले लखनऊचे बॅकड्रॉप
'मुंबई सागा’ची शूटिंग टाळण्याचा परिणाम सरळ 'सत्यमेव जयते-2' वर झाला. हा चित्रपट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शूट होणार होता. पण आता याचे नियोजन बारगळले असून ते सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये शूटिंग होण्याची शक्यता आहे. 'मुंबई सागा'चे शूटिंग मुंबईत होणार असल्याने या चित्रपटाचे लोकेशन लखनऊमध्ये शिफ्ट करण्यात आले.