आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला:यंदा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2', सलमान खानच्या 'राधे'सोबत होऊ शकते टक्कर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानच्या 'राधे'सोबत होणार टक्कर

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत जॉनने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितले आहे. सोबतच या पोस्टमध्ये तो भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहे.

जॉनने सांगितल्यानुसार, त्याचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 14 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

खरं तर हा चित्रपट मागील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर पडले. पण आता जॉनने चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
सलमानच्या 'राधे'सोबत होणार टक्कर
विशेष म्हणजे दरवर्षी ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होत असतो. मात्र, यावेळी सलमानच्या चित्रपटासह जॉनच्या चित्रपटाचीही ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे. अलीकडेच सलमानने एक पोस्ट शेअर करत त्याचा बहुप्रतिक्षित राधे हा चित्रपट ईदला रिलीज करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे यंदा तिकिटबारीवर सलमान आणि जॉनच्या चित्रपटांची टक्कर बघायला मिळणार आहे.

'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉनची दुहेरी भूमिका
'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन अब्राहमची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे. त्याचवेळी, दुसर्‍या भूमिकेत तो शत्रूंचा नायनाट करताना दिसणार आहे. अशा प्रकारे जॉन सत्याग्रह आणि हिंसा या दोन्ही द्वारे भ्रष्टाचा-यांना धडा शिकवणार आहे. चित्रपटात जॉनचा अ‍ॅक्शन अवतार बघायला मिळणार आहे.

10-12 किलो वजन कमी केले
सूत्रांनी सांगितल्यानुसार, जॉनने या चित्रपटासाठी लीन फिजिक ठेवले आहे. यासाठी त्याने त्याचे वजन 10 ते 12 किलोपर्यंत कमी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉनने ट्रकचा टायर फाडला होता. तर आता दुस-या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरसोबत अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात तो 50 गुंडांसोबत एकटा लढताना दिसेल.

क्लायमॅक्सच्या अ‍ॅक्शन सीन्सची लांबी वाढवली
क्लायमॅक्सच्या अ‍ॅक्शन सीन्सची लांबी वाढविली गेली आहे. याचे शूटिंग 21 जानेवारीला पूर्ण झाले. लखनौ शेड्यूलमध्ये बरेच अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यात आले आहेत. विशेषत: मलिहाबादच्या शेतात अ‍ॅक्शन सीन्सची शूटिंग करण्यात आली आहे.

चित्रपटात दमदार संवाद
दिग्दर्शक मिलाप झावेरींच्या या चित्रपटात दमदार संवाद असणार आहेत. जॉनचे बहुतेक संवाद हे रायमिंगमध्ये आहेत. डीओपी टीममधील एका सदस्याने सांगितले की, "एका दृश्यात एक मुस्लिम महिला पेन्शन घ्यायला येते. तिच्या हातात कुराण आहे. परंतु विभागातील कर्मचारी तिला पेन्शन देण्यास नकार देतात आणि तिचा हाकलून देतात. तेव्हाच बॅकग्राउंडमध्ये तिरंगा फडफडतो आणि जॉनची एंट्री होते. तो भ्रष्ट कर्मचार्‍यांना धडा शिकवतो. तेव्हा ती मुस्लिम महिला नमाज अदा करते.' अ‍ॅक्शनची ट्रीट असलेला 'सत्यमेव जयते 2' हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होण्याची शक्यता आहे.

ही आहे चित्रपटाची स्टारकास्ट
‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे.