आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर सिने प्रीमिअर:जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते 2'ला सिंगल स्क्रीनवर चांगला बिझनेस होण्याची अपेक्षा, निर्माते थिएटर सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

मनीषा भल्लाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती.

बॉलिवूडमध्ये काही स्टार्स असे आहेत, ज्यांच्या चित्रपटांना मल्टिप्लेक्सपेक्षा सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जास्त मागणी असते. जॉन अब्राहमचा आगामी 'सत्यमेव जयते 2' हादेखील असाच एक चित्रपट आहे. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल, तेव्हा निर्मात्यांसह सिंगल स्क्रीन मालकांना चांगला फायदा होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे जोवर थिएटर सुरु होत नाहीत, तोवर हा चित्रपट रिलीज होणार नाहीये. त्यामुळे जॉनच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आत्मविश्वास इतका की सलमानला टक्कर देण्यास तयार होते

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटासह ‘सत्यमेव जयते - 2’ हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलमानचा चित्रपट असूनही जॉनचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करू शकतो, असा विश्वास 'सत्यमेव जयते 2'च्या निर्मात्यांना होता.

तीन वर्षानंतर येत आहे पार्ट 2
'सत्यमेव जयते' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉन अब्राहमसह मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होता. यामध्ये जॉन अब्राहमने साकारलेली सीरियल किलरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. 2500 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

38 कोटींच्या निर्मिती खर्चात बनलेल्या या चित्रपटाने 79 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. या चित्रपटाचे कमर्शिअल सक्सेस लक्षात घेऊन त्याचा दुसरा भाग प्लान करण्यात आला, परंतु पहिल्या भागाचा या कथेचा काही संबंध नाही. ही पूर्णपणे नवीन कहाणी आहे.

जॉन पहिल्यांदा दुहेरी भूमिकेत
'सत्यमेव जयते 2'ची सर्वात खास गोष्ट म्हणजे जॉन अब्राहम यात दुहेरी भूमिकेत आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही पहिली दुहेरी भूमिका आहे. एका भूमिकेत तो एक सामान्य व्यक्ती आहे, तर दुस-या भूमिकेत तो अॅक्शन करताना दिसेल.

मिलाप झवेरींना आणखी एक संधी
दिग्दर्शक म्हणून मिलाप झवेरींचा 'सत्यमेव जयते' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. संपूर्ण कारकीर्दीत ते लेखक म्हणून अधिक यशस्वी झाले आहेत. लेखक म्हणून त्यांनी शूट आउट एट वडाला, देसी बॉइज, ग्रँड मस्ती, एक व्हिलन, हाऊसफुल, हे बेबी असे चित्रपट लिहिले आहेत. त्यांनी सत्यमेव जयते - 2 देखील लिहिला आहे.

ओटीटी डीलपेक्षा थिएटरकडून जास्त फायदा होतो
चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी काहीही सांगण्यास नकार दिला. चित्रपटाशी संबंधित इतर सूत्रांनी सांगितले की, पार्ट वनच्या यशानंतर निर्मात्यांना थिएटर रिलीजचा अधिक फायदा मिळू शकेल, अशी आशा आहे. ओटीटीमध्ये जेवढे उत्पन्न मिळते, त्याहून अधिक नफा हा थिएटर रिलीज करुन मिळत असतो.

स्वतः जॉन म्हणाला होता की, बहुतेक कमी दर्जाचे चित्रपट ओटीटीवर येतात
काही महिन्यांपूर्वी जेव्हा ओटीटीवर काही चित्रपट प्रदर्शित होत होते, तेव्हा जॉनचा चित्रपटही ओटीटीवरच येईल अशी चर्चा रंगू लागली होती. पण जॉनने हे वृत्त फेटाळून लावले होते. डायरेक्ट ओटीटी रिलीज होणारे बहुतेक चित्रपट हे कमी दर्जाचे असतात, असे जॉनने म्हटले होते. अशा चित्रपटांना थिएटर रिलीजकडून फारशी अपेक्षा नसते, असेही तो म्हणाला होता.

छोट्या शहरातून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे
व्यापार विश्लेषक गिरीश वानखेडे सांगतात, जॉन अब्राहमचे चित्रपट बी आणि सी टाऊनमध्ये चांगले चालतात. जॉन करत असलेली अॅक्शन आणि कहाणी सिंगल स्क्रीनवर ठिकठाक बिझनेस करते. दुसरे म्हणजे या चित्रपटात देशप्रेमाचा तडका देखील आहे. थिएटर रिलीजच्या प्रतीक्षेसाठी हे योग्य कॅलक्युलेशन ठरु शकते.

जॉनच्या चाहत्यांचा एक वेगळा वर्ग आहे
जॉन अब्राहमचा स्वतःचा एक फॅन क्लब आहे, असे चित्रपट निर्माते आणि व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांचे मत आहे. जॉन हा सिंगल स्क्रीनचा हीरो आहे. त्याचा फॅन क्लबही वेगळा आहे. जॉनचे मुंबई सागा, सत्यमेव जयते 1, बाटला हाऊस, अ‍टॅक, जिस्म, धूम, शूटआऊट एट वडाला, मद्रास कॅफे, टॅक्सी नंबर 9211, हाऊसफुल - 2 हे चित्रपट सिंगल स्क्रीनवर अधिक चालले होते.

बातम्या आणखी आहेत...