आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता जॉन अब्राहम सध्या उत्तर प्रदेशात असून ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. आता त्याने पुन्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्यांच्या आंदोलनावर आधारित आहे. शिवाय चित्रपटात करप्ट नेत्यांनी केलेल्या विविध घोटाळ्याचा उल्लेखही आहे. प्रॉडक्शनशी जोडलेल्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाचे काही मुख्य भाग बनारसमध्ये चित्रित केले आहेत.
जॉनचे पात्र भ्रष्टाचारी नेत्यांचे रहस्य उघड करणार
सेटवरील एका युनिट मेंबरच्या मते, जॉन चित्रपटात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहे. तो एका राजकीय पार्टीशी जोडलेला असतो. त्याने चित्रपटाचे महत्त्वाचे गाणेदेखील बनारसमध्ये शूट केले आहे. अभिनेता विजय कुमार आणि राजेंद्र गुप्ता चित्रपटात शेतकऱ्याच्या भूमिकेत आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी जॉनचे पात्र मोहीम चालवतो. जॉनचे पात्र देशभक्त असतो. तो अनेक भ्रष्टाचारी नेत्यांची रहस्य लोकांसमोर आणतो. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे, तरीदेखील येथे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरली नाही, याचा तो विचार करत असतो. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी तो एक अभियान चालवतो.
काशीच्या घाटावर शूट झाले गाणे
काशीतील गंगेच्या काठावर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढवल्या जाणाऱ्या मोहिमेच्या गाण्याचे दृश्य चित्रित करण्यात आले. याची कोरिअोग्राफी आदिल शेखने केली आहे. एका सत्याग्रहाप्रमाणे ते सुरू होते. या लढ्यात शेतकरी आणि सामान्य लोकदेखील सहभागी होतात. काशीच्या आधी लखनऊमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तेथे राजकीय घडामोठी आणि भ्रष्टाचार नेत्यांना धडा देणारे भाग चित्रित करण्यात आले.
भरपूर अॅक्शन असेल - मिलाप झावेरी, डायरेक्टर
'सत्यमेव जयते’पेक्षा या चित्रपटात तिप्पट अॅक्शन असेल. गेल्या वेळेस जॉनने फक्त टायर फाडले होते आणि मोबाइल हातानेच फोडला होता. यावरुन या चित्रपटात फायटिंगचा अंदाज आला असेल. यात भरपूर अॅक्शन असणार आहे. ती लोकांना आवडेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.