आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊनच्या नियमता शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व गोष्टीदेखील हळूहळू पुर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमारसुद्धा त्यांच्या आगामी 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्साहित आहेत. कोरोनाच्या बचावासाठी अद्याप लस आली नसली तरी दोघेही शूटसाठी तयार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी याला दुजोरा दिला आहे. निर्मात्यांची रणनीतीही त्यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये शेअर केली आहे.
लॉकडाऊनपूर्वी आम्ही स्क्रिप्ट तयार केली होती. निखिल आणि माझे देखील जॉनबरोबर बरेच बोलणे होत राहिले आहे. मला वाटते की, सहनिर्माते म्हणून निखिल अडवाणींचे एमए एंटरटेन्मेंट आणि जॉन अब्राहम एंटरटेन्मेंटचा खूप चांगला पाठिंबा आहे. आम्ही एकत्र अजूनही काही गोष्टी करत आहोत. जॉन निखिलचा पुढचा चित्रपट 'गोरखा'देखील करत आहे. गेल्या तीन महिन्यांत दर दुस-या किंवा तिस-या दिवशी माझे जॉनशी यासंदर्भात बोलणे होत राहिले आहे. चित्रपटाला जेवढ्या बजेटची गरज आहे, तेवढा त्यावर पैसा खर्च केला जाईल, असे मला वाटते.
संपूर्ण टीम या चित्रपटासाठी उत्साही आहे. लॉकडाऊन कालावधी दरम्यान संपूर्ण टीमने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बरीच चर्चा केली. अॅक्शनपासून म्युझिकपर्यंत सर्व गोष्टींवर बरीच चर्चा झाली आहे. आम्ही लवकरात लवकर शूटिंग पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहोत. प्रथम ड्रॅमेटिक सीन शूट होतील की अॅक्शन याबाबत मात्र निर्णय झालेला नाही. आम्ही वेळापत्रक तयार करत आहोत. आणि सोबतच स्टार्सच्या तारखा देखील घेत आहोत. जॉन अब्राहम, दिव्या खोसला दोघेही शुटिंग सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
आम्ही सर्व सेफ्टी मेजर्ससह अॅक्शन सीन शूट करू. कमी लोकांसह शूट कसे करावे याचा विचार करीत आहोत. आम्ही निश्चितपणे व्हीएफएक्सच्या मदतीने गर्दी दाखवू. मला 'सत्यमेव जयते 3'ची आयडियाही सुचली आहे. आम्ही सेटवर पूर्ण तयारीनिशी जाऊ. प्रोड्यूसर गिल्डने जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थातच एसओपी जारी केले आहे, त्याचे आम्ही अनुसरण करु.
जॉनने व्यायामाने खूप चांगली बॉडी बनवली आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी आधीही म्हटले आहे, की जॉन सत्यमेव जयते 2 मध्ये इंक्रेडिबल हल्कसारखा दिसेल. त्या प्रकारची अॅक्शन तो करणार आहे.
जॉन अब्राहम आणि दिव्या दोघेही शूटिंगसाठी तयार आहेत. त्यांच्याशिवाय अक्षय सरही तयार आहेत. त्यांनी मध्यंतरी एक शॉर्ट फिल्मदेखील चित्रीत केली आहे. व्हॅक्सीन असो अथवा नसो, जॉन आणि दिव्या शूटिंगसाठी सज्ज आहेत. अर्थात आम्ही सर्वजण सुरक्षा बाळगू पण कामावर नक्कीच परतू. 'सत्यमेव जयते 2' च्या चित्रीकरणाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करु.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.