आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉलिवूड स्टार जॉनी डेपने अलीकडेच त्याची पुर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डविरुद्ध मानहानीचा खटला जिंकला. हा आनंद साजरा करण्यासाठी जॉनी त्याच्या मित्रांसह यूकेतील बर्मिंगहॅमयेथील एका भारतीय रेस्तराँमध्ये पोहोचला. रिपोर्ट्सनुसार, डेपने वाराणसी रेस्तराँमध्ये जेवणासाठी तब्बल 45 लाखांहून अधिक रुपये खर्च केले. डेपसोबत संगीतकार जेफ बेकही यावेळी दिसला.
भारतीय रेस्तराँमध्ये केले जेवण
वाराणसी रेस्तराँने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर डेपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेता तेथील कर्मचाऱ्यांसोबत पोज देताना आणि लोकांशी बोलताना दिसत आहे. यावेळी जॉनी डेपने हाफ जॅकेट, ब्लू डेनिम्स आणि ऑफ व्हाइट शर्टसह, डोक्यावर कॅप आणि काळे शूज घातले होते.
45 लाखांपेक्षा जास्त होते जेवणाचे बिल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेप रविवारी रात्री जेफसह 20 मित्रांसह रेस्तराँमध्ये पोहोचला होता. जॉनी आणि त्याच्या मित्रांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रेस्तराँ सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले. रेस्तराँचे जॉइंट ऑपरेशन डायरेक्टर मोहम्मद हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचे जेवणाचे बिल 45 लाख रुपयांपेक्षा जास्त होते. तसेच मोहम्मद यांनी सांगितल्यानुसार, जॉनी खूप नम्र व्यक्ती आहे.
जॉनीने लंडनमध्ये केला होता स्टेज शो
जॉनीने नुकताच लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये जेफसोबत स्टेज शो केला. जेफने प्रेक्षकांना जॉनीबद्दल बोलताना सांगितले, "मी या व्यक्तीला पाच वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि तेव्हापासून आम्ही कधीही हसणे थांबवले नाही. आम्ही एकत्र एक अल्बम बनवला आहे. हे कसे घडले ते मला माहित नाही, परंतु ते घडले. आता हा जुलैमध्ये रिलीज होईल." अंबर हर्डविरुद्ध खटला जिंकल्यानंतर जॉनी जेफसोबत न्यूकासलच्या पबमध्ये दिसला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.