आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना पळून जा:जॉनी लीव्हरने कोरोना दिली धमकी, गाणे गात म्हणाले - ‘कोरोना अब तेरा रोना शुरू होने वाला है’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॉनी लीव्हर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई लॉकडाऊनमुळे सध्या घरीच वेळ घालवत असलेल्या जॉनी लीव्हर यांनी अलीकडेच आपल्या फॅन्सना मोटिव्हेट करताना कोरोनाव्हायरसवर एक गाणे तयार केले आहे. या गाण्याद्वारे जॉनी यांनी कोरोनाव्हायरसला धमकी दिली आहे आणि लोकांना घरी राहण्याचा सल्लाही दिला आहे.

जॉनी लीव्हर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात जॉनी यांनी 'हम हिंदुस्तानी' या लोकप्रिय गाण्याचे बोल बदलत त्याला कोरोनाव्हायरससोबत जोडले आहे. पोस्टसह त्यांनी लिहिले, "कोरोनाव्हायरस को वॉर्निंग. हम हिंदुस्तानी'.

व्हिडिओच्या सुरुवातीस जॉनी म्हणतात, ‘कोरोना,कोरोना। अब तेरा रोना शुरू हो जाएगा। ऐसा भागेगा तू’ यापूर्वीही जॉनी यांनी चाहत्यांना कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी घरीच राहाण्याची विनंती केली होती.

बातम्या आणखी आहेत...