आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइन डिटेल्स:‘तेहरान’ आणि ‘तारिक’द्वारे जॉनचे OTT पदार्पण शक्य, सहनिर्माते स्वीकारत आहेत ‘दसवीं’ पॅटर्न

अमित कर्ण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी चित्रपटगृहांत अनेक मोठ्या चित्रपटांचे वाईट हाल झाले. अशात आपल्यावर फ्लॉपचा शिक्का बसू नये, यासाठी नजीकच्या भविष्यात अनेक मोठे अभिनेते आपले चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करणार आहेत. अशा अभिनेत्यांच्या यादीत जॉन अब्राहमचाही समावेश होऊ शकतो. तथापि, जॉन आतापर्यंत सातत्याने असा दावा करत आला आहे, की तो मोठ्या पडद्याचा हीरो असून, 299 किंवा 499 रुपयांत लोकांसाठी उपलब्ध होऊ इच्छित नाही. शाहरुख खानसोबत त्याचा ‘पठाण’ येत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रजासत्ताकदिनी प्रदर्शित होणार आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’नेही अलीकडेच चित्रपटगृहांत बरी कमाई केली होती. असे असतानाही त्याचा ‘तेहरान’ किंवा ‘तारिक’ यापैकी एक ओटीटीवर जाऊ शकतो. दोन्ही चित्रपटांचे सहनिर्माते ‘बेक माय केक फिल्म्स’ आहेत.

वर्षाखेरपर्यंत ‘तारिक’चे चित्रीकरण होईल
‘बेक माय केक फिल्म्स’च्या प्रमुख शोभना यादव म्हणाल्या, की ‘तारिक’ही ‘तेहरान’प्रमाणे सत्य घटनेवर आधारित आहे. ‘तेहरान’चे सलग चित्रीकरण सुरू होते. ‘तारिक’चे चित्रीकरण वर्षअखेरपर्यंत करणार आहोत. हा ‘तेहरान’पेक्षा वेगळा चित्रपट आहे. दोन्हींमध्ये समानता एकच, ती म्हणजे जॉन. ‘तारिक’ला आम्ही गेल्या दीड वर्षापासून डेव्हलप करत होतो. आता आम्ही फ्लोअरवर जात आहोत. यापूर्वी जॉनसोबत आम्ही ‘बाटला हाऊस’ केले आहे. ‘तेहरान’ही आम्ही सोबत करत आहोत. आमच्यासोबत स्टुडियो पार्टनर दिनेश व्हिजनची कंपनी भागीदार आहे. निर्माता म्हणून जॉनही आमच्यासोबत आहे. ‘तारिक’मध्ये निश्चितच अद्याप दिनेश बोर्डावर नाही. पुढे स्टुडिओ आमच्यासोबत येऊ शकतो. आम्ही टी-सीरीजसोबतही येऊ शकतो.’

‘तेहरान’च्या प्रदर्शनावर निर्मात्यांमध्ये बनत आहे एकमत
सूत्रांनी सांगितले की, तेहरानच्या प्रदर्शनाबाबत निर्मात्यांमध्ये एकमत बनत आहे. त्याच्या प्रदर्शनावेळी थिएटर्सच्या चित्रपटांची रिकव्हरी लक्षात घेतली जाणार आहे. तेव्हा परिस्थिती चांगली असेल तरच चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. अन्यथा तो थेट ओटीटावर प्रदर्शित करण्याचा विचार आहे. येथे मेकर्स आपला मागील चित्रपट ‘दसवीं’ची पद्धत अवलंबणार आहेत. तो थिएटरमध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित करण्याचे ठरले. तेहरान सध्या तरी थिएटरला डोळ्यासमोर ठेवूनच बनवला जात आहे. मात्र मेकर्स त्याला डायरेक्ट टू ओटीटीवर नेण्यासही तयार असल्याचे समजते.

अन्य मोठ्या अभिनेत्रींची तारीख न मिळाल्याने बोर्डावर आली मानुषी छिल्लर
‘तेहरान’मध्ये जॉनसोबत मानुषी छिल्लर आहे. सूत्रांनुसार, ‘चित्रपटात जुन्या आणि प्रस्थापित अभिनेत्रींची फारशी गरज नव्हती. त्यामुळे मानुषीला घेण्यात आले. मानुषीचे ‘पृथ्वीराज’मधील काम दिग्दर्शकांना आवडले होते. परिणामी, तिला घेण्यात आले. मानुषीने यात अॅक्शनही केली आहे. तिची भूमिका पोलिस निरीक्षकाची आहे. जॉनच्या तारखा निश्चित झाल्या होत्या, हेही मानुषीला घेण्याचे एक कारण आहे. त्या तारखांनुसार अन्य मोठ्या अभिनेत्री उपलब्ध होणे अवघड होते. त्यामुळे चित्रपटात मानुषीचे आगमन झाले.’

‘पठाण’शी संघर्ष टाळण्यासाठी ‘तेहरान’ लांबणीवर पडू शकतो
जॉनने ‘तेहरान’साठी ग्लासगो येथील चित्रीकरण पूर्ण केले आहे. आता दिल्लीचे शेड्यूल बाकी आहे. तेथील 10 ते 15 दिवसांचे चित्रीकरण राहिलेले आहे. जॉनच्या निकटवर्तीयांनी सांगितले, की, ‘तेहरान’च्या प्रदर्शनाची तारीख 26 जानेवारी जाहीर करण्यात आली आहे पण तो दिवस ‘पठाण’शी क्लॅश होत असेल तर प्रदर्शन पुढे ढकलले जाऊ शकते. ते यासाठी की ‘बाटला हाऊस’ चित्रपट अक्षयकुमारच्या ‘मिशन मंगल’शी क्लॅश झाला होता. त्यामुळे चित्रपटाच्या ओपनिंगवर परिणाम झाला होता.

बातम्या आणखी आहेत...