आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेपी दत्तांच्या मुलीचे लग्न:जयपूरमध्ये ज्या ठिकाणी झाले होते आईवडिलांचे लग्न त्याच ठिकाणी 7 मार्च रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे निधी दत्ता

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'फना'सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक आहे बिनॉय

प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक जेपी दत्ता आणि अभिनेत्री बिंदिया गोस्वामी यांची मुलगी निधी दत्ता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वृत्तानुसार, 7 मार्च रोजी ती जयपूरमध्ये दिग्दर्शक बिनॉय गांधीसह लग्न करणार आहे. 6 मार्च रोजी त्यांची संगीत सेरेमनी होईल. खास गोष्ट म्हणजे जयपूरमधील ज्या ठिकाणी निधीच्या आईवडिलांचे लग्न झाले होते, तेच ठिकाण तिने आपल्या लग्नासाठी निवडले आहे. 1985 मध्ये बिंदिया गोस्वामी आणि जेपी दत्ता यांनी लग्न केले होते.

जयपूर हे निधीचे दुसरे घरच आहे
एका इंग्रजी न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, 'जयपुरमध्येच जे.पी.दत्ता यांनी बिंदिया गोस्वामी यांना लग्नाची मागणी घातली होती. या दोघांनी ज्या ठिकाणी आणि ज्या झाडाखाली लग्न केले होते, निधी आणि बिनॉय देखील त्याच झाडाखाली सप्तपदी चालणार आहेत. इतकेच नाही तर निधी जयपूरला तिचे दुसरे घर मानते. ती लहानपणापासूनच आईबरोबर इथे कायम येत असते.'

निधीला डिसेंबरमध्ये करायचे होते लग्न
गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी निधी आणि बिनॉय यांचा साखरपुडा झाला होता. त्यांचा मागील वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा विचार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त लोकांना लग्नसााठी आमंत्रित करणे शक्य नसल्याचे समजल्यावर त्यांनी लग्न लांबणीवर टाकले होते. आता येत्या 7 मार्च रोजी दोघे विवाहबद्ध होणार आहेत. निधीने तिच्या जवळच्या लोकांना लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवायला सुरुवात केली आहे.

पहिली भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती
निधी आणि बिनॉय यांची पहिली भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात निधी अभिनेत्री म्हणून झळकणार होती. मात्र हा प्रोजेक्ट अर्ध्यावरच बंद पडला होता. मात्र निधी आणि बिनॉय यांच्यात खूप चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

'फना'सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक आहे बिनॉय
बिनॉयने 'गायब' (2004), 'फना' (2006) आणि 'तेरी मेरी कहानी' (2012) सारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. तर निधी एक निर्माता आहे आणि त्याने 'पलटन' (2018) ची निर्मिती केली आहे. त्याने 'उमराव जान' (2006) साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...