आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या कुटुंबात 35 वर्षांपासून आहे वैर, म्हणाले - चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर आमच्यात चांगली मैत्री झाली आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्युनियर एनटीआरने मानले राम चरणचे आभार

एसएस राजामौली यांचा नुकताच रिलीज झालेला 'RRR' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. पण दुसरीकडे ज्युनियर एनटीआरने एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितल्यानुसार, राम चरण आणि त्याच्या कुटुंबात 35 वर्षांपासून शत्रुत्व आहे. पण या चित्रपटानंतर राम चरण आणि त्याच्यात चांगली मैत्री झाली आहे.

एनटीआर आणि राम चरण यांच्या कुटुंबात 35 वर्षांपासून वैर आहे

ज्युनियर एनटीआरने सांगितले, "आम्ही दोघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले दोन अभिनेते आहोत. मला हे उघड करायला हवे की नको, हे मला समजत नाहीये. पण आम्हा दोघांच्या कुटुंबात जवळपास 30-35 वर्षांपासून वैर आहे. आणि आज आम्ही दोघेही एकाच चित्रपटात आहोत. 'RRR' नंतर मात्र संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. आता राम चरण आणि मी खूप चांगले मित्र आहोत," असा उलगडा ज्युनियर एनटीआरने केला आहे.

ज्युनियर एनटीआरने मानले राम चरणचे आभार
ज्युनियर एनटीआरने याआधी सोशल मीडियावर राम चरणचा उल्लेख मोठा भाऊ असा करत त्याचे आभार मानले होते. त्याने लिहिले होते, "चरण माझा भाऊ, मी तुझ्याशिवाय 'आरआरआर'मध्ये अभिनय करण्याची कल्पनाही करू शकत नाही. अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेला तुझ्याशिवाय कुणीही न्याय देऊ शकत नाही. फक्त 'RRR'च नाही तर भीमसुद्धा तुमच्याशिवाय अपूर्ण राहिला असता..धन्यवाद."

600 कोटींच्या निर्मिती खर्चात बनला 'RRR'

'RRR' हा चित्रपट एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे. हिंदी आणि तेलुगू व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट आणि अजय देवगणसारख्या स्टार्समुळे या चित्रपटाची चर्चा हिंदीतही कायम आहे. याआधी हा चित्रपट 7 जानेवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद होती. पण परिस्थिती सुधारल्यानंतर हा चित्रपट 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 600 कोटींच्या निर्मिती खर्चात हा चित्रपट बनला आहे.

बातम्या आणखी आहेत...