आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगली बातमी:नीतू कपूर यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह, मुलगी रिद्धिमाने सोशल मीडियावर दिली माहिती; म्हणाली - ‘माझ्या आईसाठी प्रार्थना केल्याबद्दल तुमचे आभार'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिद्धिमाने आई नीतूसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

अभिनेत्री नीतू कपूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच नीतू चंदीगड येथे आपल्या आगामी जुग जुग जियो या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेल्या असताना त्यांना तिथे कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर नीतू यांना एअर अॅम्बुलन्सने चंदीगडहून मुंबईत आणण्यात आले होते.

रिद्धिमाने आई नीतूसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यासह लिहिले, ‘तुम्ही सर्वांनी माझ्या आईसाठी प्रार्थना केल्याबद्दल तुमचे आभार. माझ्या आईचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे’, असे रिद्धिमाने कॅप्शन दिले आहे. नीतू यांच्याव्यतिरिक्त चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता, अभिनेता वरुण धवन आणि मनीष पॉल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संक्रमित झाल्यानंतर मनीष चंदीगडहून मुंबईला परतला. तर राज मेहता आणि वरुण धवन चंदीगड येथेच क्वारंटाइन आहेत. हे सर्वजण अनिल कपूर, किआरा आडवाणी आणि संपूर्ण टीमसह चंदीगड येथे जुग जुग जियोचे चित्रीकरण करत होते. अनिल कपूर आणि किआरा आडवाणी यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. हे दोघेही मुंबईत आले होते. सध्या चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

गुरुवारी नीतू कपूर यांनी दिले होते स्वतःचे हेल्थ अपडेट

कोरोनाची लागण झाल्यानंतर नीतू कपूर यांनी गुरुवारी सोशल मीडियावर स्वतःचे हेल्थ अपडेट दिले होते. नीतू यांनी लिहिले होते, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी सेल्फ क्वारंटाइन झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत असून स्वत:ची काळजी घेत आहे. माझ्या प्रती काळजी आणि प्रेम व्यक्त केल्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर बाळगा आणि काळजी घ्या”, अशी पोस्ट नीतू कपूर यांनी केली होती.

वरुण धवनने दिली होती कोरोनाची लागण झाल्याची माहिती
वरुण धवनने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करुन त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. वरुणने फोटो शेअर करुन लिहिले होते, 'या महामारीच्या काळात कामावर परतलो होतो. मात्र कोविडच्या विळख्यात सापडले. प्रॉडक्शन हाऊसकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. मात्र आयुष्यात काहीही निश्चित नसतं. विशेषतः कोविड 19. कृपया आपली जास्तीत जास्त काळजी घ्या. माझ्या सोशल मीडियावर लवकरात लवकर बरे व्हा, असे चाहत्यांचे मेसेज बघतोय. त्यासाठी सगळ्यांचे आभार.'

ऋषी यांच्या निधनानंतर नीतू यांचा हा पहिला चित्रपट
यावर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा 'जुग-जुग जियो' हा पहिला चित्रपट आहे. शूटसाठी रवाना होताना नीतू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिले होते, "या कठीण काळातली माझी पहिली फ्लाइट. मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे." पुढे त्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करुन लिहिले, "कपूर साहेब, माझा हात धरायला तुम्ही इथे नाहीत, पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्याबरोबर आहात."

‘जुग जुग जियो’ या चित्रपटात नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्यासह वरुण धवन, किआरा आडवाणी, प्राजक्ता कोळी ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser