आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर, अभिनेता वरुण धवन आणि दिग्दर्शक राज मेहता यांच्यानंतर आता अभिेता मनीष पॉलला कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण चंदिगडमध्ये अनिल कपूर, किआरा आडवाणी आणि संपूर्ण टीमसह आगामी ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. मनीष मुंबईला परतला आहे. मात्र तो घरात क्वारंटाइन आहे की हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मनीष पॉल हा गेल्या काही दिवसांपासून ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो मुंबईत परतला. त्यानंतर त्याला तापासारखी लक्षण दिसू लागली. यामुळे खबरदारी बाळगत त्याने कोरोनाची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे.
अद्याप मनीषने कोविड 19 पॉझिटिव्ह झाल्याबद्दल सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकलेली नाही. तर दुसरीकडे वरुण धवनने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करुन त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे.
वरुणने फोटो शेअर करुन लिहिले, 'या महामारीच्या काळात कामावर परतलो होतो. मात्र कोविडच्या विळख्यात सापडले. प्रॉडक्शन हाऊसकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. मात्र आयुष्यात काहीही निश्चित नसतं. विशेषतः कोविड 19. कृपया आपली जास्तीत जास्त काळजी घ्या. माझ्या सोशल मीडियावर लवकरात लवकर बरे व्हा, असे चाहत्यांचे मेसेज बघतोय. त्यासाठी सगळ्यांचे आभार.'
एअर अॅम्बुलन्सने चंदीगडहून मुंबईत परतल्या नीतू कपूर
62 वर्षीय अभिनेत्री नीतू कपूर यांचा कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीतू कपूर यांची प्रकृती ठिक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक राज मेहता आणि वरुन धवन यांचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांनीही चंदीगड येथेच क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल कपूर यांचा कोविड 19 चा रिपोर्ट निगेटिव्ह
दुसरीकडे शुक्रवारी दुपारपर्यंत अनिल कपूरदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी होती, मात्र त्यांनी सोशल मीडियावर ही बातमी फेटाळली. आपल्या सोशल मीडिया स्टोरीत अनिल यांनी लिहिले की, "अफवांना पूर्णविराम देण्यासाठी... माझी कोविड -19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काळजी आणि प्रार्थनाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." वृत्तानुसार, अनिल चंदीगडहून मुंबईला परतले आहेत. याची पुष्टी करताना बोनी कपूर म्हणाले, "अनिल कपूरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे." या चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबविण्यात आले आहे. सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांची कोविड टेस्ट केली जात आहे.
थांबवण्यात आले चित्रीकरण
त्याशिवाय किआरा आडवाणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होते. मात्र तिला लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या कोरोना झालेले कलाकार कोरोनामुक्त होण्याची वाट बघितली जात आहे. त्यानंतरच चित्रपटाचे पुन्हा शूटिंग सुरु करता येणार आहेत.
ऋषी यांच्या निधनानंतर नीतू यांचा हा पहिला चित्रपट
यावर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा 'जुग-जुग जियो' हा पहिला चित्रपट आहे. शूटसाठी रवाना होताना नीतू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिले होते, "या कठीण काळातली माझी पहिली फ्लाइट. मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे." पुढे त्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करुन लिहिले, "कपूर साहेब, माझा हात धरायला तुम्ही इथे नाहीत, पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्याबरोबर आहात."
‘जुग जुग जियो’ या चित्रपटात नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्यासह वरुण धवन, किआरा आडवाणी, प्राजक्ता कोळी ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.