आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुही चावलाची रिअल लाइफ लव्ह स्टोरी:पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर खचले होते जय मेहता, अशी झाली जुही-जय मेहता यांची भेट आणि लग्न

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री जुही चावलाचा आज वाढदिवस आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला हिचा आज (13 नोव्हेंबर) वाढदिवस असून तिने वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. 13 नोव्हेंबर 1967 रोजी हरियाणातील अंबाला येथे तिचा जन्म झाला. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या जुहीची प्रेमकहाणी देखील एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी आहे. जुहीच्या पतीचे नाव जय मेहता असून ते तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठे आहेत.

जुही जेव्हा पहिल्यांदा जय यांना भेटली तेव्हा त्यांची पत्नी सुजाता बिर्ला यांचे निधन झाले होते. सुजाता यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता.

दिग्दर्शकाने घालून दिली होती भेट

- 1992 सालीची ही गोष्ट आहे. त्यावेळी जुही 'करोबार' या चित्रपटाचं शूटिंग करत होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि बिझनेसमन जय मेहता यांची चांगली मैत्री होती. शूटिंगदरम्यानच राकेश यांनी जुही आणि जय यांची भेट घालून दिली होती

- चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात जुही आणि जय अनेकवेळा भेटले. मात्र, त्यानंतर दोघांनी एकमेकांबद्दल फारसा रस दाखवला नाही. जेव्हा जुहीला कळते की, जय यांच्या पत्नीचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे, तेव्हा तिला जय यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागली. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि नंतर ते एकमेकांच्या जवळ आले.

- जेव्हा दोघांनी लग्नाचा विचार केला, त्याच्या काही दिवसांतच जुहीच्या आईचा कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेने जुहीला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी ती लग्नाबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हती. जुहीला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी जय यांनी तिला खूप मदत केली. अखेर 1995 मध्ये जुही-जयचे लग्न झाले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहेत.

जुहीचे करिअर
जुहीने 1986 मध्ये 'सुल्तनत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. 2 वर्षानंतर ती 'कयामत से कयामत तक' चित्रपटात दिसली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि जुही रातोरात स्टार झाली. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मेहता ग्रुपचे मालक आहेत जय मेहता
जय मेहता हे मेहता ग्रुप या बहुराष्ट्रीय कंपनीचे मालक आहेत. यासोबतच त्यांच्या दोन सिमेंट कंपन्या आहेत. शाहरुख खानसोबत ते आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचे सहमालक देखील आहेत.

बातम्या आणखी आहेत...