आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झुमका गिरा रे:अभिनेत्री जुही चावलाचे हिऱ्याचे कानातले मुंबई विमानतळावर हरवले, शोधून देणा-याला बक्षीस देण्याची केली घोषणा केली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी सकाळी जुही चावला मुंबई विमानतळाच्या गेट नंबर 8 वर जात होती, त्यादरम्यान तिचे कानातले कोठेतरी पडले.

अभिनेत्री जूही चावलाचे डायमंडचे कानातले मुंबई विमानतळावर हरवले आहे. स्वतः जुहीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याची माहिती दिली आणि सोबतच कानातले शोधून देणा-याला बक्षीस देणार असल्याचेही म्हटले आहे.

जुहीने यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 'सकाळी (रविवारी) मी मुंबई विमानतळाच्या गेट नंबर 8 वर जात होतो. मी एमिरेट्स काउंटरवर चेक इन केले, सिक्युरिटी चेकिंग झाली, पण यादरम्यान माझे हिऱ्याचे कानातले कुठेतरी पडले. कोणी माझी मदत केली तर मला खरंच खूप आनंद होईल. मी गेल्या पंधरा वर्षांपासून हे कानातले घालत आहे. कृपया ते शोधण्यात माझी मदत कर. कानातले सापडले तर कृपया पोलिसांना माहिती द्या. मी तुम्हाला बक्षीस देईन”, असे जुहीने म्हटले आहे.

जूहीने आपल्या डायमंड इअररिंग्सचा फोटोदेखील शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी विमानतळ व्यवस्थापनावर व्यक्त केली होती नाराजी
काही दिवसांपूर्वी जुहीने विमानतळावर कोरोनाच्या कालावधीमध्ये असलेली व्यवस्थापनातील दिरंगाई आणि त्यामुळे होणाऱ्या गर्दीवरुन नाराजी व्यक्त केली होती. आयपीएलसाठी दुबईला गेलेली
जुही नोव्हेंबर महिन्यात मायदेशी परतली होती. मात्र दुबईवरुन परतल्यानंतर मुंबई विमानतळावर क्लियरन्ससाठी अनेक प्रवाशी दोन तासाहून अधिक काळ रांगेत उभे असल्याचे सांगत जुहीने या गर्दीचा
एक व्हिडिओ पोस्ट केला होता. “मी विमानतळ प्राधिकरण आणि सरकारी यंत्रणांना विनंती करते की त्यांनी विमानतळांवरील आरोग्य तपासणी केंद्रावर अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. सर्व प्रवासी
अशाप्रकारे अनेक तास विमानतळावर अडकून पडलेत. त्यात एका मागून एक विमान येत असल्याने परिस्थिती आणखीनच चिंताजनक होते. ही परिस्थिती अगदी लाज आणणारी आहे,” अशा शब्दांमध्ये
जुहीने आपला संताप व्यक्त केला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser