आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी:ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर म्हणाला - माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहत्यांना सांगितले- काळजी करू नका मी ठीक आहे

तेलुगु चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः एनटीआरने सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. ज्युनिअर एनटीआर आणि त्याचे कुटुंबीय सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि त्यांनी संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही केले आहे.

चाहत्यांना सांगितले- काळजी करू नका मी ठीक आहे
ज्युनिअर एनटीआरने पोस्टमध्ये लिहिले- 'माझी कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. मी आणि माझ्या कुटुंबाने स्वतःला आयसोलेट केले आहे. आम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा,' असे त्याने म्हटले आहे.

या तेलुगू सेलिब्रिटींना झाली कोरोनाची लागण
ज्युनिअर एनटीआरपूर्वी अल्लू अर्जुन, पवन कल्याण, राम चरण, कल्याण धेव, निवेथा थॉमस यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. ज्युनिअर एनटीआरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे त्याचा 'आरआरआर- रणम, रौद्रम, रुधिरम' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये 13 ऑक्टोबरला एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...