आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:मुघल-ए-आझम बनवायला लागली 14 वर्षे, दोनच चित्रपट दिग्दर्शित केले परंतु सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये होते गणना

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • के. आसिफ यांच्याशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घेऊया -

आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक के. आसिफ यांची 100 वी जयंती आहे. के. आसिफ यांना ऐतिहासिक चित्रपट मुघल-ए-आझमसाठी ओळखले जाते. त्यांचा जन्म यूपीतील इटावा येथे झाला होता आणि 1945 मध्ये आलेल्या 'फूल' या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. आसिफ यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ 2 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, मात्र मुघल-ए-आझम सारखा ऐतिहासिक चित्रपट बनवून चित्रपट जगताच्या इतिहासात त्यांनी आपले नाव अजरामर केले. मुघल-ए-आझम हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, जो त्यांनी त्याच पद्धतीने बनवला होता. ज्या काळात 5 ते 10 लाख रुपयांचे चित्रपट बनत होते, त्या काळात त्यांनी या चित्रपटासाठी 1.5 कोटींची गुंतवणूक केली होती. हा चित्रपट के. आसिफ यांचे पॅशन असल्याचे म्हटले जाते.

चला तर मग आज या चित्रपटाबद्दल आणि के. आसिफ यांच्याशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घेऊया -

फाळणीमुळे चित्रपट पुन्हा सुरू झाला

आर्देशीर इराणी यांचा 'अनारकली' हा चित्रपट पाहिल्यानंतर के. आसिफ यांना 'मुघल-ए-आझम' बनवण्याची कल्पना सुचली. हा चित्रपट पाहून के. आसिफ यांनी त्यांचा मित्र शिराज अली हकीम यांच्यासोबत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मुघल-ए-आझमचे शूटिंग सुरू झाले आणि शिराज या चित्रपटाची निर्मिती करत होते, परंतु त्याच दरम्यान, 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली आणि शिराज पाकिस्तानमध्ये गेले. त्यामुळे मुघल-ए-आझमचे शूटिंग थांबवण्यात आले. 1952 मध्ये के. आसिफ यांनी चित्रपटाला नव्याने सुरुवात केली.

जेव्हा के. आसिफ नोटांनी भरलेली ब्रीफकेस घेऊन नौशादकडे पोहोचले

के. आसिफ मुघल-ए-आझमच्या संगीताविषयी खूप काळजीत होते. त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी संस्मरणीय संगीत हवे होते. त्यावेळी नौशाद हे सर्वोत्कृष्ट गीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे के. आसिफ नोटांनी भरलेली सुटकेस घेऊन नौशाद यांच्याकडे पोहोचले आणि सुटकेस त्यांच्या हातात दिली. त्यांना सांगितले की, मला या चित्रपटासाठी चांगले संगीत हवे आहे. नौशाद यांना हे अजिबात आवडले नाही आणि त्यांनी 'संगीताचा दर्जा पैशाने येत नाही' असे आसिफला सांगून नोटांनी भरलेली सुटकेस खिडकीतून फेकून दिली. त्यावेळी आसिफ यांची माफी मागण्याची शैली एवढी वेगळी होती की नौशाद हसत हसत सहमत झाले.

बडे गुलाम अली यांना हवे तेवढे मानधन दिले होते
चित्रपटाचे संगीत नौशाद यांनी दिले होते. जेव्हा गाण्यासाठी विचार झाला तेव्हा नौशाद यांनी विचार न करता बडे गुलाम अली साहब हेच नाव घेतले, परंतु बडे गुलाम अली त्यावेळी चित्रपटात गाणे गात नसे. एखाद्या कार्यक्रमात किंवा स्टेजवर गाण्याची त्यांना आवड होती. त्यावेळी बडे गुलाम अली यांनी मी चित्रपटात गात नाही, असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, तर के. आसिफही हार मानणारे नव्हते. हे गाणे त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड होणार यावर ते ठाम होते. बडे गुलाम अली यांनी या गाण्यासाठी 25000 रुपयांची मागणी करत आसिफ यांना टाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लता मंगेशकर, रफी यांसारख्या गायकांना गाण्यासाठी 300 ते 400 रुपये मिळायचे. बडे गुलाम अली यांना एका गाण्यासाठी एवढ्या मोठे मानधन मिळणे अशक्य वाटत होते, पण के. आसिफ यांनी त्यांना 'गुलाम साहब आप तो बेशकिमती हैं, ये लीजिए 10,000 रुपए एडवांस।' असे सांगितले. आता गुलाम साहबांकडे नकार द्यायचे दुसरे कोणतेही कारण नव्हते, त्यामुळे त्यांना या चित्रपटात गाणे गाण्यास होकार द्यावा लागला. चित्रपटातील सलीम आणि अनारकलीच्या प्रेम दृश्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आवाजातील गाणे वाजते.

के. आसिफ पृथ्वीराज यांच्यासोबत गरम वाळूवर चालले
एके दिवशी वाळवंटात मुघल-ए-आझमचे शूटिंग सुरू होते, ज्यामध्ये पृथ्वीराज कपूर गरम वाळूवर चालतानाचे दृश्य चित्रित करत होते. मात्र यादरम्यान त्यांच्या पायाला उष्ण वाळूमुळे फोड आले आणि के. आसिफ यांना याची माहिती मिळाली. मग काय जेव्हा तो सीन रीशूट झाला तेव्हा पृथ्वीराज कॅमेऱ्यासमोर वाळूवर चालायचे आणि के. आसिफ कॅमेऱ्यामागे. अशा प्रकारे त्यांचे समर्पण सर्वांना समजले.

अर्धा रंगीत आणि अर्धा ब्लॅक अँड व्हाइट बनला चित्रपट
भारतीय चित्रपटसृष्टीत मुघल-ए-आझमच्या चित्रीकरणादरम्यान रंगीत चित्रपटांचे युग आले होते. हे लक्षात घेऊन के. आसिफ यांनी 'प्यार किया तो डरना क्या' या गाण्यासह चित्रपटातील काही दृश्ये रंगीत चित्रित केली, जी त्यांना खूप आवडली. त्यामुळे त्यांनी संपूर्ण चित्रपट रंगीत करण्याचे ठरवले. चित्रपटाच्या शूटिंगला 10 वर्षांहून अधिक काळ लोटला होता आणि चित्रपटाचे बजेटही अनेक पटींनी वाढले होते. या गोष्टींमुळे त्रस्त झालेल्या निर्माते आणि वितरकांनी पुन्हा शूटिंग सुरू करण्याची योजना रद्द केली. त्यामुळे 14 वर्षांत बनलेला हा चित्रपट अर्धा रंगीत आणि अर्धा कृष्णधवल प्रदर्शित झाला.

के. आसिफ आणि दिलीप कुमार यांच्यातील फरक

या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान या चित्रपटाशी निगडीत लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढउतार आले. एकीकडे दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे 9 वर्षे जुने नाते तुटले होते. दिलीप कुमार यांचे मधुबालाशी लग्न होऊ नये म्हणून मधुबालाचे वडील सर्वतोपरी प्रयत्न करत होते आणि त्यामुळे संपूर्ण शूट दरम्यान दोन्ही कलाकार एकमेकांशी बोलले नाहीत. दुसरीकडे के. आसिफ यांनी दिलीप कुमार यांची बहीण अख्तर खानशी लग्न केले. एकदा अख्तर आणि के. आसिफ यांच्यात भांडण झाले आणि दिलीप कुमार मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले, तेव्हा के. आसिफ यांनी दिलीप कुमारला 'तुझे स्टारडम माझ्या घराबाहेर ठेव' असे खडसावून सांगितले. यामुळे दिलीप एवढे चिडले की ते या चित्रपटाच्या प्रीमियरलाही गेले नाहीत.

एका गाण्यासाठी 10 लाख रुपये खर्च केले

मुघल-ए-आझममधील 'प्यार किया तो डरना क्या' गाण्याच्या चित्रीकरणासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. हा तो काळ होता जेव्हा संपूर्ण चित्रपट इतक्या पैशात बनत असे. सुमारे 105 गाणी नाकारल्यानंतर नौशाद साहेबांनी हे गाणे निवडले. पण रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तो सूर गवसत नव्हता, जो या गाण्यात हवा होती. त्यामुळे हे गाणे लता मंगेशकर यांनी चक्क बाथरूममध्ये गायले होते. हे गाणे आतापर्यंतच्या उत्कृष्ट चित्रीकरणासाठी ओळखले जाते. 'ए मोहब्बत झिंदाबाद' याच चित्रपटातील एका गाण्यासाठी मोहम्मद रफींसह १०० गायकांनी सुरात सूर मिसळला. हा चित्रपट भव्य बनवण्यासाठी के. आसिफ यांनी चित्रपटातील प्रत्येक छोट्या गोष्टीची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली होती.

500 ट्रक आणि 100 रिफ्लेक्टरने शीशमहल उजळला

के. आसिफ यांनी या चित्रपटासाठी मोठा आणि भव्य सेट बांधला होता. चित्रपटाच्या काही भागांच्या शूटिंगसाठी लाहोरमधील शीशमहलचा डुप्लिकेट सेट तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये काचेचा वापर करण्यात आला होता. सेटवर मोठ्या संख्येने आरसे असल्यामुळे प्रकाश परावर्तित होऊ लागला, त्यामुळे ब्रिटीश दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी इतक्या रिफ्लेक्शनमुळे काम करण्यास नकार दिला, त्यानंतर के. आसिफ यांनी क्रू मेंबर्ससोबत मिळून काचांवर मेणाचा थर चढवला. रिफ्लेक्शनची अडचण दूर झाली पण व्हिज्युअल्स अस्पष्ट दिसू लागले, मग सिनेमॅटोग्राफर आर डी माथूर यांनी आरशांवर पातळ कापड टाकून शूटिंग सुरू केले. हा शीशमहल 500 ट्रकच्या हेडलाइट्स आणि 100 रिफ्लेक्टरने उजळून निघाला होता.

जेव्हा के. आसिफ यांनी खऱ्या मोतींसाठी शूटिंग थांबवले

मुघल-ए-आझममधील एका दृश्यात सलीमला मोत्यांवर चालत महालात प्रवेश करायचा सीन होता. या सीनसाठी नकली मोती आणले होते, पण के. आसिफ यांना ते दृश्य वास्तववादी वाटले नाही. त्यांनी चित्रपटाचे फायनान्सर शाहपूरजी मिस्त्री यांच्याकडे एक लाख रुपये मागितले. जेव्हा त्यांनी विचारले की, तुम्हाला हे पैसे का हवे आहेत, तेव्हा के. आसिफ म्हणाले - 'मला या सीनसाठी खरे मोती हवे आहेत'. शाहपुरजी मिस्त्री रागाने म्हणाले, "तुम्ही वेडे झाला आहात का, तुम्ही कृत्रिम मोती देखील वापरू शकता, काय फरक पडणार आहे". त्यावेळी के. आसिफ म्हणाले- 'त्याने फरक पडेल. यामुळे शाहपुरजी संतप्त झाले आणि जवळपास 20 दिवस चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. सुमारे 20 दिवसांनंतर शाहपुरजींनी के. आसिफ यांना ईदच्या निमित्ताने घरी बोलावून ईदी म्हणून 1 लाख दिले. ज्यातून के. आसिफ यांनी शूटसाठी खरे मोती विकत घेतले.

के. आसिफ या चित्रपटासाठी पूर्णपणे कर्जबाजारी झाले आहेत

के. आसिफ हा चित्रपट बनवण्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे कर्जात बुडाले होता, पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक चित्रपट बनला. सुरुवातीच्या टप्प्यात या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. पुढे हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचा मैलाचा दगड ठरला.

भाड्याच्या घरात जीवन जगले
के. आसिफ आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिलो. ते सर्वत्र टॅक्सीने यायचे. लोकांनीही त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. मुघल-ए-आझमनंतर, त्यांनी सस्ता खून, मनगा
पानी आणि लव्ह एंड गॉड सारखे चित्रपट बनवण्याचे काम सुरू केले, परंतु त्याच दरम्यान 9 मार्च 1971 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...