आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार महुआ मोईत्रांचा निर्माती लीना यांना पाठिंबा:म्हणाल्या- माझ्यासाठी काली माता मांस खाणारी आणि दारू पिणारी देवी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काली मातेची अनेक रूपे आहेत.

TMC खासदार महुआ मोइत्रा यांनी आता चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकल यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टर वादावर वक्तव्य केले आहे. एका मीडिया चॅनलच्या कॉन्क्लेव्हमध्ये 'काली'च्या पोस्टर वादावर महुआ यांनी लीना मणीमेकल यांचे समर्थन केले आहे. माझ्यासाठी काली माता मांस खाणारी आणि दारु पिणारी देवी आहे, असे वादग्रस्त वक्तव्य महुआ मोइत्रा यांनी केले आहे.

महुआ म्हणाल्या, काली मातेची अनेक रूपे आहेत. माझ्यासाठी काली ही मांसाहार करणारी, दारुचा स्वीकार करणारी देवी आहे. लोकांची वेगवेगळी मते आहेत, मला या पोस्टरवर काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. तुम्हाला तुमच्या देवीची कल्पना करण्याचे स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी देवतांना मद्य अर्पण केले जाते. तर इतर काही ठिकाणी ते धर्मनिंदा मानला जातो, असे मत महुआ यांनी मांडले आहे.

त्या पुढे म्हणाल्या- तुम्हाला तुमचा देव कसा दिसतो, हे तुमच्यावर अवलंबून असते. भूतान आणि सिक्कीममध्ये गेल्यास पहाटेच्या पूजेमध्ये देवाला दारू अर्पण केली जाते, मात्र उत्तर प्रदेशातील एखाद्याने देवाला दारू दिली तर त्याच्या भावना दुखावू शकतात. माझ्यासाठी देवी कालीचे स्वतःचे रूप आहे. तिची अनेक रूपात पूजा केली जाते, असे त्या म्हणाल्या.

फिल्ममेकर लीना मनिमेकलाई यांनी 'काली' या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
फिल्ममेकर लीना मनिमेकलाई यांनी 'काली' या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

मला माझ्या पद्धतीने काली मातेकडे बघण्याचे स्वातंत्र्य आहे
महुआने पुढे म्हणाल्या, जर तुम्ही तारापीठात गेलात तर तुम्हाला काली माँच्या मंदिराजवळ अनेक साधू धूम्रपान करताना दिसतील. अनेक लोक अशा काली मातेची पूजा देखील करतात. हिंदू असूनही मला माझ्या काली मातेला पाहण्याचे स्वातंत्र्य आहे आणि लोकांनाही हे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. उपासनेचा अधिकार वैयक्तिक जागेतच राहिला पाहिजे. मला काली मातेच्या या लूकमध्ये काहीही गैर वाटत नाही.

लीना मणीमेकल यांच्यावर दिल्ली आणि उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल
या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने दिग्दर्शक लीना मणीमेकल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लीना यांच्यावर 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम 153अ, 295अ अन्वये गुन्हा दाखल केला. यासोबतच लीनाविरुद्ध उत्तर प्रदेशातील लखनऊ, गोंडा आणि लखीमपूर येथे तीन गुन्हे दाखल आहेत.

येथून सुरु झाला वाद
लीना यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी 'काली' या माहितीपटाचे पोस्टर रिलीज केले, ज्यामध्ये कालीमातेच्या रुपात असलेली अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवली आहे. पोस्टरमध्ये एका हातात कालीमातेच्या हातात त्रिशूळ आहे तर दुसऱ्या हातात समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

मी कुणालाही घाबरत नाही: लीना
पोस्टर रिलीज झाल्यानंतर वाढता वाद पाहून लीना यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, "माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. जी माणसं कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा असतो. मी कोणालाही घाबरत नाही आणि याची किंमत जर माझे आयुष्य असेल तर मी तेही द्यायला तयार आहे." लीना यांनी 2 जुलै 2022 रोजी 'काली'चे पोस्टर लाँच केले होते. त्यांनी सांगितल्यानुसार, त्या ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमाचा एक भाग होता. त्याअंतर्गत अगा खान संग्रहालयामध्ये त्यांनी हे पोस्टर लाँच केले होते. जेव्हा लीना यांना टीकेचा सामना करावा लागला, तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर अकाउंट प्रायव्हसी करत कमेंट सेक्शन बंद केले.

विरोधानंतर लीना यांनी तामिळमध्ये एक पोस्ट शेअर करत लिहिले, "हा चित्रपट एका अशा घटनेची कथा आहे ज्यात एका संध्याकाळी कालीमाता प्रकट होते आणि टोरंटोच्या रस्त्यांवरून फिरू लागते. जेव्हा तुम्ही हा माहितीपट पाहाल तेव्हा मला अटक करण्याचे हॅशटॅग न वापरता मला प्रेम द्याल."

बातम्या आणखी आहेत...