आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 वर्षांचे झाले कबीर बेदी:तीन लग्न तुटल्यानंतर कबीर बेदींनी वयाच्या 70 वर्षी स्वतःपेक्षा 30 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत थाटले होते चौथे लग्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कबीर बेदी आपल्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात.

16 जानेवारी, 1946 रोजी लाहोर (पाकिस्तान) मध्ये जन्मलेले अभिनेते कबीर बेदी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. 1971 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या कबीर यांनी 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. यात बॉलिवूडसह इंटरनॅशनल चित्रपटांचा समावेश आहे.

‘खून भरी मांग’, 'मैं हूं ना', ‘कच्चे धागे’, 'ताजमहल', 'काइट्स', 'ब्लू' हे त्यांचे निवडक गाजलेले चित्रपट आहेत. कबीर बेदी आपल्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात.

70 व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी केले होते चौथे लग्न

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 70 व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी 15 जानेवारी, 2016 रोजी कबीर यांनी स्वतःपेक्षा जवळजवळ 30 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंड परवीन दोसांजसोबत लग्न केले होते. खास गोष्ट म्हणजे कबीर यांची चौथी पत्नी परवीन त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा वयाने चार वर्षांनी लहान आहे. कबीर यांची चौथी पत्नी परवीन ब्रिटिश वंशाची अभिनेत्री आणि मॉडेल आहे. लग्नापूर्वी हे दोघे 10 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते.

प्रोतिमा बेदी होती कबीर बेदींची पहिली पत्नी

कबीर बेदी यांचे पहिले प्रसिद्ध अफेअर होते मॉडेल आणि नृत्यांगना प्रोतिमा बेदीसोबत. कबीर आणि प्रोतिमा यांचे विचार, जीवनशैलीसह अनेक गोष्टी सारख्या होत्या. त्यांच्या प्रेमाचे लग्नात रुपांतर झाले होते. 1969 मध्ये कबीर आणि प्रोतिमा यांनी लग्न केले होते. त्यांना पूजा आणि सिद्धार्थ ही दोन मुले झाली. मात्र या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. मात्र विभक्त झाल्यानंतरही हे दोघे चांगले मित्र होते. कबीर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर प्रोतिमा यांनी म्हटले होते, की त्यांच्या आयुष्यात आता दुस-या व्यक्तीला स्थान नाही. त्यांनी केवळ कबीरवरच प्रेम केले. याचदरम्यान त्यांचा मुलगा सिद्धार्थने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्युमुळे प्रोतिमा यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काही दिवसांनी एका दुर्घटनेत प्रोतिमा यांचे निधन झाले. प्रोतिमा आणि कबीर यांची मुलगी पूजा बॉलिवूड अभिनेत्री आहे.

परवीन बाबीसोबत होते अफेअर

पहिली पत्नी प्रोतिमापासून विभक्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री परवीन बाबीची एन्ट्री झाली होती. दोघांच्या लाइफ स्टाइलमध्ये बरेच साम्य होते. कबीर यांच्यासह परवीनने हॉलिवूडचा पल्ला गाठला होता. मात्र कबीर आपल्या कामात इतके बिझी होते, की ते आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे परवीनच्या लक्षात आले. काही दिवसांनी या दोघांचेही मार्ग वेगळे झाले.

ब्रिटिश फॅशन डिझायनरसोबत थाटले होते दुसरे लग्न

परवीन बॉबीनंतर कबीरचे सुत ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हम्प्रेससोबत जुळले. दोघांनी लग्नही केले. सुसान आणि कबीर यांचा एक मुलगा आहे. अदम बेदी त्याचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे. हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला.

रेडिओ प्रेजेंटरसोबत तिसरे लग्न

1990 साली कबीर बेदी यांनी टीव्ही आणि रेडिओ प्रेसेंटर निक्की बेदीसह लग्न केले. त्यांचे नाते 15 वर्षे टिकले. 2005 साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर कबीर ब्रिटिश महिला परवीन दुसांजसह रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर दोघांनी लग्न केले. विशेष म्हणजे परवीनचे वय कबीर यांची मुलगी पूजा बेदीपेक्षाही लहान आहे.

नाटकादरम्यान झाली होती परवीन दुसांजसोबत कबीर बेदींची पहिली भेट...
परवीन आणि कबीर यांची पहिली भेट लंडन येथे एका नाटकादरम्यान झाली होती. ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सेंट्रल लंडनच्या शेफ्ट्सबरी थिएटरमध्ये कबीर यांचा प्ले होता. परवीन आपल्या काही मित्रांसोबत त्यांचे नाटक बघायला गेली होती. तिथेच दोघांची पहिली भेट झाली, भेटीचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात झाले आहे.

कबीर बेदी प्रेमाने परवीनला म्हणतात 'पंजाबी शेरनी'
परवीनने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून ती पंजाबी कुटुंबातील सदस्य आहे. तिला गुरमुखी नीट वाचता येते. इतकेच नाही तर कबीर बेदी तिला पंजाबी शेरनी म्हणून हाक मारत असल्याचेही तिने या मुलाखतीत उघड केले होते.

आफताब शिवदासानीचे साडभाऊ झाले कबीर बेदी
परवीनसोबत लग्नानंतर कबीर बेदी, अभिनेता आफताब शिवदासानीचे साडभाऊ झाले आहेत. आफताबची पत्नी निन दोसांज परवीनची धाकटी बहीण आहे. 11 जून 2014 रोजी आफताब आणि निन यांचे लग्न झाले होते. परवीनला एकुण सहा बहिणभावंड असून ती सगळ्यात मोठी आहे. तिचा भाऊ परविंदर एका बँकेत कामाला असून बहीण कलविंदरचे ब्युटी स्पा आणि बिझनेस आहे. तर आणखी एक बहीण सुकी ही सोनी म्युझिकसाठी काम करते. लंडन आणि मुंबईत ती वास्तव्याला असते. तिसरी बहीण निन जी आफताबची पत्नी आहे, ती हाँगकाँगमध्ये एका लग्झरी ब्रॅण्डसाठी काम करते. सर्वात धाकटा भाऊ कुलदीप बँकर आहे.

बातम्या आणखी आहेत...