आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शकाचे वादग्रस्त वक्तव्य:कबीर खान म्हणाले -  देशाचे खरे निर्माते हे मुघल होते, नेटकरी सोशल मीडियावर करत आहेत ट्रोल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले कबीर खान?

'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान यांनी एका वादाला तोंड फोडले आहे. चित्रपटांमध्ये मुघल सम्राटांना चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले, त्यांना चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून आपल्याला त्रास होतो असे वक्तव्य कबीरखान यांनी व्यक्त केले. इतकेच नाही तर मुघल हेच खरे 'राष्ट्रनिर्माता आहेत,' असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

काय म्हणाले कबीर खान?
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीर म्हणाले, 'मला हे फार अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते. कारण लोकप्रिय कथानकासाठी हे सारे केले जात हे पाहून मला अस्वस्थ व्हायला होते. मुघलांना कायम व्हिलन का दाखवले जाते हे प्रेक्षकांना समजले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर इतिहास आणि संशोधन वाचले तर मुघलांना नकारात्मक भूमिकेत का दाखवले हा फार कठीण प्रश्न वाटतो. माझ्या मते ते देश घडवणारे खरे शासक होते. मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या असे तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय हे दाखवले पाहिजे. नुसते बोलून मोकळे होणे योग्य नाही. यावर खुली चर्चा करा.एखादे कथानक लोकप्रिय होईल म्हणून त्यानुसार कथानक रचू नका,' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर झाले ट्रोल
सोशल मीडियावर कबीर खान यांच्यावर नेटक-यांनी कडाडून टीका केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कबीर खान यांच्याविरोधात ट्विट करत त्यांचा निषेध केला आहे. नेटकरी म्हणाले की, मंदिर उद्धवस्त करणे अथवा विद्यापीठे जाळणे हे जर राष्ट्र निर्माण करणे असेल तर खरोखरच मुघल 'राष्ट्र निर्माते' आहेत.

बातम्या आणखी आहेत...