आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी 'KGF 2' आणि 'कांतारा' या कन्नड चित्रपटांनी उत्तर भारतात आपला झेंडा रोवला होता. नवीन वर्षात दक्षिणेत 'कब्जा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. निर्माते आनंद पंडित यांनी या चित्रपटावर मोठा डाव लावला आहे. ते या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. हा बिग बजेट चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या चित्रपटात किच्चा सुदीप आणि अभिनेता उपेंद्र राव प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा स्वातंत्र्यापुर्वीची आहे. दिव्य मराठीशी संवाद साधताना आनंद पंडित म्हणाले- 'स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि नंतरचा भारत वेगळा होता. त्याचप्रमाणे कोविड काळापूर्वीचा सिनेमा आणि आताचा सिनेमा यात फरक आहे. कारण कोविडमुळे OTT मजबूत झाला आहे. लोकांची चित्रपट पाहण्याची सवय बदलली आहे.'
'कब्जा' हा चित्रपट आजच्या प्रेक्षकांसाठी आहे - आनंद पंडित
'कब्जा' हा असाच एक चित्रपट आहे. आम्ही हा चित्रपट 1200 स्क्रीन्सवर रिलीज करणार आहोत. मूळ हा कन्नड भाषेत चित्रीत झालेला चित्रपट आहे. तो इतर भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. 'कब्जा' या चित्रपटाची तुलना थेट 'KGF 2' सोबत होऊ शकते, असे आनंद पंडितदेखील मान्य करतात.
'कब्जा' ही स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे
आनंद पुढे म्हणाले, "कब्जा या चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर KGF चा फील येत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कब्जाची बहुतेक तांत्रिक टीम KGF चीच आहे. अर्थात आमची कब्जाची स्टोरी वेगळी आहे, त्याकाळात आपले राष्ट्र शेकडो संस्थानांमध्ये विभागले गेले होते. त्यामुळे आमची पात्रे वेगवेगळी राज्ये काबीज करण्यासाठी धडपडताना दिसतील." असे आनंद पंडित यांनी सांगितले आहे.
तेथे पुन्हा युद्ध सुरू होते. त्यामुळे आमची कथा त्या काळातील गुंडांकडून प्रेरित आहे. काही सिनेमॅटिक लिबर्टीज घेतल्या आहेत. किच्चा सुदीप आणि उपेंद्र राव हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील मोठे गुंड आहेत.
गुंडांना देशातील प्रत्येक यंत्रणा काबीज करायची होती - आनंद
आनंद पुढे सांगतात, 'मुळात त्या गुंडांना देशाची प्रत्येक यंत्रणा काबीज करायची होती, जेणेकरून ते संपूर्ण शहरावर राज्य करू शकतील. या चित्रपटाचे नियोजन कोविड काळात करण्यात आले आहे. ही एक पिरियड फिल्म आहे. स्वातंत्र्याच्या काळाची निर्मिती करणे आमच्यासाठी सोपे काम नव्हते."
आम्ही 'देसी बॉयज 2' आणि 'ओमकारा'चा रिमेक बनवू - आनंद
आनंद यांनी सांगितल्यानुसार, ते इतर भाषेतील चित्रपटांची निर्मिती करत आहेत. तमिळ, तेलगू आणि इतर भाषेतील स्टार्सशी बोलणी सुरू आहेत. हिंदी मी सरकार 4, देसी बॉईज आणि ओंकारा यांचा रिमेक करणार आहे. त्यांच्या लिखाणाचे काम सध्या सुरू आहे. स्टारकास्ट आणि दिग्दर्शक कोण असतील, हे अद्याप ठरलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.