आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक मिळालेल्या प्रसिद्धीवर भुबन यांची प्रतिक्रिया:'कच्चा बादाम' फेम गायक भुबन बड्याकर म्हणाले- अचानक पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्याने माझे डोके फिरले होते

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता माझे पाय कायम जमिनीवरच राहतील.

'कच्चा बादाम' या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेले भुबन बड्याकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि त्यानंतर झालेल्या कार अपघाताबद्दल सांगितले. भुबन यांनी सांगितल्यानुसार, ते अजूनही सामान्य जीवन जगत आहेत. पण अचानक प्रसिद्धी मिळाली आणि त्यातून बरेच पैसे आले. त्या पैशांतूनच एक सेकंड हँड कार विकत घेतली होती. अचानक आलेला पैसा आणि प्रसिद्धी यामुळे आपले डोके फिरले होते, अशी कबुलीदेखील त्यांनी दिली आहे. परंतु आता आपली चूक लक्षात अली असून वैयक्तिक आयुष्यात आपण असे नाही, असेही भुबन म्हणाले आहेत.

गरज पडल्यास पुन्हा शेंगदाणे विकणार भुबन
भुबन बड्याकर कच्चा बादाम या गाण्याने रात्रीतून स्टार झाले. त्यांना अनेक ठिकाणी गाणे गाण्यास बोलावले जात होते. त्यांना सादरीकरणासाठी मानधन दिले जात आणि त्यातून त्यांची बरीच कमाई झाली होती. याबाबत भुबन म्हणाले, "मिळालेल्या प्रसिद्धीनंतर असे वाटले होते की, आता शेंगदाणे विकण्याची गरज नाही. परंतु ती माझी चुक होती. मी सेलिब्रिटी नाही, हे मला समजले आहे. गरज पडल्यास पुन्हा शेंगदाणे विकेन. माझ्यावर विश्वास ठेवा मी आजही तोच शेंगदाणे विकणारा व्यक्ती आहे. मी नेहमी जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करतो. मला आता कळले आहे की, मला कारची गरज नाही. अचानक पैसा आणि लोकप्रियता मिळाल्यामुळे, माझे डोके फिरले होते. पण आता मला माझे आयुष्य कसे जगायचे ते माहित आहे. आता माझे पाय कायम जमिनीवरच राहतील," असे ते म्हणाले.

परदेशात परफॉर्म करण्यासाठी ऑफर्स येत आहेत
भुबन सांगतात, 'कच्चा बादाम'च्या प्रचंड यशानंतर त्यांना केरळ, बांगलादेश आणि अगदी दुबईमध्ये परफॉर्म करण्याची ऑफर देण्यात आली, परंतु त्यांच्याकडे पासपोर्ट नाही आणि त्यांच्या पत्नीदेखील परदेशी जाण्याची इच्छा नाही. त्यामुळेच दुबईची ऑफर नाकारल्याचे भुबन सांगतात.

'कच्चा बादाम' नंतर भुबन यांनी आणखी दोन गाणी रचली

'कच्चा बादाम'ला मिळालेल्या तुफान यशानंतर भुबन यांनी आणखी दोन गाणी तयार केली आहेत, जी रिलीजसाठी सज्ज आहेत. त्यापैकी एका गाण्याचे नाव आहे 'सारेगमपा' आणि दुसऱ्या गाण्याचे नाव 'अमार नोतुन गारी' असे आहे. या गाण्याच्या माध्यमातून ते त्यांच्या आयुष्याबद्दल सांगणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...