आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत अभिनेते, कॉमेडियन आणि संवाद लेखक कादर खान यांचा थोरला मुलगा अब्दुल कुद्दूस यांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, गुरुवारी त्यांनी कॅनडामध्ये अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. कुद्दूस यांनी स्वत:ला कायम प्रसिद्धीपासून दूर ठेवले आणि कॅनडामधील विमानतळावर ते सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होते.
कुद्दूस यांच्यामुळे कादर खान यांनी खलनायकाची भूमिका वठवणे केले होते बंद
एका मुलाखतीत कादर खान यांनी सांगितले होते की, कुद्दूसमुळेच त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणे बंद केले होते. ते म्हणाले होते, "माझा मोठा मुलगा कुद्दूस मित्रांसोबत खेळून फाटलेल्या कपड्यांमध्ये घरी आला. चित्रपटाच्या शेवटी खलनायक म्हणून मला नेहमीच मारहाण केली जात असे. मुलाच्या मित्रांनी त्याला म्हटले की, तुझे वडी लोकांना मारहाण करतात म्हणून शेवटी त्यांना मारहाण केली जाते. अशा प्रतिक्रिया ऐकून कुद्दूस चिडायचा आणि त्याचे त्याच्या मित्रांशी भांडण होत असते. एके दिवशी तो घरी आला तेव्हा त्याला खूप दुखापत झाली होती. मला स्वतःचा खूप राग आला आणि मी आता व्हिलनची भूमिका स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला. त्यावेळी 'हिम्मतवाला' हा विनोदी चित्रपट तयार होत होता आणि तेथूनच मी कॉमिक रोल करण्यास सुरुवात केली,' असे कादर खान यांनी सांगितले होते.
कादर खान यांचे 2018 मध्ये झाले होते निधन
31 डिसेंबर 2018 रोजी कादर खान यांचे निधन झाले होते. वयाच्या 88 व्या वर्षी कॅनडामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. तेथील मिसिसॉगामधील मीडो वेले स्मशानभूमीत त्यांना सुपुर्त-ए-खाक करण्यात आले होते. त्यावेळी कुद्दूस तेथे हजर होते. कुद्दूस यांच्याशिवाय कादर खान यांना सरफराज खान आणि शाहनवाज खान ही आणखी दोन मुले आहेत. हे दोघेही बॉलिवूडचा एक भाग आहेत.
सरफराजने 'तेरे नाम', 'मैने दिल तुझको दिया' आणि 'वाँटेड' या चित्रपटांसाठी निर्माता म्हणून काम केले आहे, तर शाहनवाजने 'मिलेंगे मिलेंगे' आणि 'हमको तुमसे प्यार है' या चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.