आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे दिग्गज संगीतकार-गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहत्यांसह बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, गायक कैलाश खेर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल काही खुलासे केले आणि सांगितले की, त्यांची प्रकृती मागील 6-7 महिन्यांपासून चांगली नव्हती. याकाळात त्यांचा बहुतेक वेळ रुग्णालयातच गेला होता.
कैलाश खेर यांच्या सासरच्या घराशेजारी आहे बप्पी दांचे घर
बप्पी लहरींबद्दल बोलताना कैलास म्हणाले, "बप्पी दांसाठी मी बरीच गाणी गायली आहेत. आमच्या अनेक भेटीगाठी झाल्या. मात्र, गाण्यापेक्षा आमच्यात आणखी एक नाते होते. ते माझ्या सासरच्या मंडळीकडून होते. माझ्या पत्नीचे माहेर जुहू येथे आहे. त्यांच्या घराच्या शेजारीच बप्पी दांचे यांचा बंगला आहे. त्यामुळे ते माझ्यावर जास्त प्रेम करायचे. जेव्हा मी त्यांना भेटायचो तेव्हा ते म्हणायचा की तू आमचा जावई आहेस. ते एवढे मनमिळावू होते की आपण त्यांना पहिल्यांदाच भेटतोय, असे आपल्याला वाटत नाही."
एक-दोन महिन्यांपासून अजिबात बोलू शकत नव्हते बप्पी दा
कैलाश यांनी पुढे सांगितले, "मागील एक दोन महिन्यांपासून त्यांना अजिबात बोलता येत नव्हते. 6-7 महिन्यांपासून त्याची प्रकृती चांगली नव्हती. देवाने त्यांना वेदनेतून मुक्त केले. मल्टी ऑर्गन फेल्युअर असेल तर ती व्यक्ती बोलू शकत नाही. याकाळात त्यांचा बहुतेक वेळ हॉस्पिटलमध्ये गेला होता.'
बप्पी यांनी कैलाश यांना म्हटले होते की, तुझ्यावर महादेवाचा आशीर्वाद आहे
बप्पी लहरी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना कैलाश म्हणाले, "जेव्हा 'अल्लाह के बंदे' हिट झाला होता, तेव्हा मी बप्पी दांसाठी खूप गाणी गायली होती. आम्ही बरीच गाणी एकत्र कंपोज केली होती. पहिल्या भेटीत त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की तू ब्लेस्ड सिंगर आहेस. गायक अनेक असतात जे शिकून येतात, पण तुझ्यावर महादेवाची कृपा आहे. त्यावेळी फक्त मी त्यांचे नाव ऐकले होते. पण त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला खूप प्रेम दिले, ज्याचे मी वर्णनही करू शकत नाही.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.