आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाची धूम:आईसोबत लग्न विधींसाठी बाहेर पडली काजल अग्रवाल, गुलाबी ड्रेसमध्ये दिसली सुंदर, आज गौतम किचलूसोबत होणार विवाहबद्ध

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत काजल अग्रवालचे लग्न होणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू आज लग्नगाठीत करणार आहेत. तत्पूर्वी काजल अग्रवाल माध्यमांसमोर आली. काजलसोबत तिची आई विनय या देखील होत्या. काजल यावेळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिच्या हातावर मेहंदी दिसली, शिवाय लग्नाचा चुडादेखील तिने घातला होता. त्यावर रुमाल बांधला होता.

हळदी आणि मेहंदीचे फोटो झाले व्हायरल

लग्नाच्या एक दिवस आधी काजलच्या मेहंदी आणि हळदी समारंभातील फोटो समोर आले होते. काजलने आईबरोबर मीडियाल पोज दिली आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभारदेखील व्यक्त केले.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर काजल आणि गौतम यांनी छोटेखानी समारंभात लग्नाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत हे लग्न होणार आहे. त्यानंतर हैदराबाद येथे वेडिंग रिस्पेशनचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत काजलने सांगितले की, लग्नानंतरही ती चित्रपटात काम सुरु ठेवणार आहे.

गौतम किचलू कोण आहे?

रिपोर्ट्सनुसार, गौतम किचलू हा एक व्यवसायिक असून तो इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोर सजावटीशी संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'डिसर्न लिव्हिंग'चा मालक आहे. तर काजल 'सिंघम', 'स्पेशल 26', 'मगधीरा' सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.