आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनई चौघड्यांचे सूर:बोहल्यावर चढण्यापूर्वी काजल अग्रवालने शेअर केला स्पेशल फोटो, कॅप्शनमध्ये लिहिले -वादळापूर्वीची शांतता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नस्थळी पोहोचण्यापूर्वी मीडियासमोर आली होती काजल

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल बिझनेसमन गौतम किचलूसोबत आज विवाहबद्ध होणार आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वी काजलने एक फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोत काजल नववधूच्या रुपात तयार होताना दिसतेय. तिच्या हातात लग्नाचा चुडा असून तिच्या मागे लहेंगा दिसतोय. या फोटोला तिने कॅप्शन दिले - वादळापूर्वीची शांतता.

  • लग्नस्थळी पोहोचण्यापूर्वी मीडियासमोर आली होती काजल

तत्पूर्वी काजल अग्रवाल माध्यमांसमोर आली होती. काजलसोबत तिची आई विनय या देखील होत्या. काजल यावेळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिच्या हातावर मेहंदी दिसली, शिवाय लग्नाचा चुडादेखील तिने घातला होता. त्यावर रुमाल बांधला होता.

काजलच्या मेहंदी व हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काजल आणि गौतमचा विवाहसोहळा पार पडणार आहे. गौतम आणि काजल हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत असल्याचे म्हटले जातं. गौतम इंटेरिअर डिझायनर आहे.

View this post on Instagram

#kajgautkitched 💛

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on Oct 29, 2020 at 4:13pm PDT

काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. 2011 मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केले. त्यानंतर ती ‘स्पेशल 26’ या चित्रपटातही झळकली.

View this post on Instagram

🧿 #kajgautkitched 🧿

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on Oct 28, 2020 at 6:00pm PDT