आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनसाइड दी वेडिंग:पंजाबी-काश्मिरी पद्धतीने झालेल्या लग्नात जीलाकर्राबेलम हा दक्षिण भारतीय विधी का झाला?, फोटो शेअर करुन काजल अग्रवालने सांगितले यामागचे कारण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटोत मॅरीड कपलचा रॉयल अंदाज बघायला मिळाला.

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबर रोजी प्रियकर गौतम किचलू याच्याशी विवाहबद्ध झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून दोघांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. लग्नाच्या दुस-या दिवशी काजलने लग्नाचे इनसाइड फोटोज शेअर केले होते. या फोटोत मॅरीड कपलचा रॉयल अंदाज बघायला मिळाला. एक खास फोटो शेअर करुन पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीने झालेल्या लग्नात जीलाकर्राबेलम ही दक्षिण भारतीय विधी का झाली? यामागचे कारण तिने सांगितले.

  • जीलाकर्राबेलाम म्हणजे काय आणि हा विधी का झाला?

काजलने लिहिले - आमच्या पंजाबी-काश्मिरी लग्नात जीलाकर्राबेलाम या विधीचा समावेश करावा लागला होता. गौतम आणि दक्षिण भारत यांच्यातील संबंधांसाठी हा विधी आवश्यक होता. तेलगू विवाहात, जीलाकर्राबेलाम हा विधी वधू-वर यांचे मिलन / विवाहाचे प्रतीक आहे. जीला कर्रा (जिरे) आणि बेलम (गूळ) ची दाट पेस्ट बनविली जाते, जी पानावर ठेवली जाते. हे पान वधू आणि वर यांच्या डोक्यावर ठेवले जाते आणि पुजारी वेद मंत्रांचा जप करतात. या विधीनंतरच वधू-वर एकमेकांना बघू शकतात. दाम्पत्य चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात एकत्र राहतील, हा या विधीमागचा उद्देश असतो.

याशिवाय काजलने नवरा गौतमसाठी एक भावनिक नोटदेखील लिहिली आहे. 'आणि अशाप्रकारे मी मिस हून मिसेस झाले. मी माझा विश्वासू, जोडीदार, जिवलग मित्र, सोल-मेटसोबत विवाहबद्ध झाले. मला आनंद आहे की, मला तुझ्यात माझे घर मिळाले.'

  • प्रत्येक पाहुण्याची झाली कोविड चाचणी

काजलने सांगितल्यानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नाचे प्लानिंग करणे हे एक मोठे आव्हान होते. तथापि, आम्ही कोविड प्रोटोकॉलचे पालन केले, आम्ही छोटेखानी समारंभात विवाहबद्ध झालो. सर्व पाहुण्यांची कोविड चाचणी करण्यात आली. आमच्या लग्नात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. अनेक जण व्हर्च्युअली या लग्नात सहभागी झाले होते. आम्ही त्यांना खूप मिस केले. लवकरच भेटण्याची मला आशा आहे.