आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या आठवणी:लग्नाच्या महिन्याभरानंतर काजलने शेअर केला लग्नाचा अनसीन फोटो, वेडिंग केक बघून म्हणाली - आणखी एक मिळू शकेल का!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज काजलच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.

काजल अग्रवालच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 30 ऑक्टोबर रोजी बिझनेसमन गौतम किचलूशी काजल विवाहबद्ध झाली होती. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजलने लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. यासह तिने पती गौतम यांना फर्स्ट वेडिंग मंथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3 खास फोटोजमधून दिल्या शुभेच्छा
काजलने तिच्या लग्नाच्या पार्टीचे 3 फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती पती गौतमसोबत अतिशय आनंदी दिसत आहे. आपला या खास दिवसाची आठवण काढत काजलने कॅप्शनमध्ये लिहिले, - आपल्याकडे आणखी एक क्रोकेम्बुश असावा आणि आपण तो पुन्हा खावा, असे होऊ शकेल का. हॅपी वन मंथ.

7 वर्षांची मैत्री आणि 3 वर्षांचे प्रेम
लग्नाला एक महिना पूर्ण होण्यापूर्वी काजलने एका मुलाखतीत सांगितले होते की - "आमचे नाते मैत्रीपासून सुरू झाले होते. आम्ही एकमेकांना 3 वर्षे डेट केलं. त्यावेळी आमच्या मैत्रीला सात वर्षे झाली होती. आम्ही मित्र म्हणून एकमेकांचे खूप खास बनलो होतो. जेव्हा प्रपोज करण्याची वेळ आली, तेव्हा ते काही भव्य अंदाजात घडले नाही. आम्ही अतिशय भावूक होऊन याविषयी बोललो होतो. माझ्यासोबत आपले भविष्य बघतोय, असे गौतम मला म्हणाला होता."

लग्नानंतर काजल आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा आगामी चित्रपट संजय गुप्तांचा 'मुंबई सागा' हा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser