आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमून एन्जॉय करतेय काजल:मालदीवमध्ये हनीमून साजरा करतेय काजल अग्रवाल, समुद्र किनारी लाल ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज, फोटो झाले व्हायरल

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये काजल स्टनिंग दिसत आहे.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू सध्या मालदीवमध्ये हनीमून साजरा करत आहेत. काजलने मालदीवच्या सुट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये काजलचा ग्लॅमरस अवतार बघायला मिळतोय.

लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये काजल स्टनिंग दिसत आहे. एका फोटोमध्ये ती गौतमसोबत रोमँटिक पोज करताना दिसत आहे.

गौतमने देखील त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. गौतमने हा फोटो शेअर करुन लिहिले आहे की, ''सर्व खबरदारी घेऊन पुन्हा प्रवास करताना मला आनंद होत आहे. हळूहळू आपण सर्व सामान्य जीवनाकडे वाटचाल करत आहोत.''

30 ऑक्टोबर रोजी झाले लग्न

काजल आणि गौतमने 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीने लग्न केले. लग्नाचे सर्व फंक्शन्स हॉटेल ताजमध्ये झाले. काजलने लग्नाच्या दिवसापासूनच लग्नाचे फोटो आणि इतर विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अलीकडेच तिने आपला पहिला करवा चौथ साजरा करतानाचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

गौतम किचलू कोण आहे?

रिपोर्ट्सनुसार, गौतम किचलू हा एक व्यवसायिक असून तो इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोर सजावटीशी संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'डिसर्न लिव्हिंग'चा मालक आहे. तर काजल 'सिंघम', स्पेशल 26, 'मगधीरा'सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...