आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबी शॉवर:कुणी तरी येणार गं..!  काजल अग्रवालने डोहाळे जेवणासाठी नेसली सुंदर लाल रंगाची साडी, शेअर केले सोहळ्याचे खास फोटो

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काजलने शेअर केले आहेत बेबी शॉवरचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच आई होणार आहे. काजलने नुकतेच तिच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटोंमध्ये काजल तिचा पती गौतम किचलू आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत दिसत आहे.

काजलने शेअर केले आहेत बेबी शॉवरचे फोटो
बेबी शॉवरच्या निमित्ताने काजल आणि गौतम या दोघांनीही ट्रेडिशनल आउटफिटची निवड केली. काजलने लाल रंगाची साडी नेसली. तर गौतम पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यासोबत मरून कलरच्या वेस्ट कोटमध्ये दिसला. पोस्ट शेअर करताना काजलने कॅप्शनमध्ये लिहिले, “बेबी शॉवर”. काजलच्या बेबी शॉवरचे हे फोटो पाहून चाहते तसेच सेलेब्स कमेंट करून आपल्या या कपलला शुभेच्छा देत आहेत.

काजलने बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला
काजलने नववर्षाच्या निमित्ताने प्रेग्नेंसीची बातमी सर्वांना सांगितली होती. बेबी बंपचा फोटो शेअर करत काजलने कॅप्शनमध्ये लिहिले होते, "मी जुन्या शेवटासाठी माझे डोळे बंद केले आहेत आणि नवीन सुरुवातीसाठी माझे डोळे उघडले आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी 2021 साठी खूप आभारी आहे आणि आशा, नम्रता आणि आनंदाने 2022 साठी पुढे जात आहे."

काजलने ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईतील ताज पॅलेसमध्ये गौतम किचलूसोबत लग्न केले होते. या लग्नाला दोघांचे काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...