आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kajal Aggarwal's Wedding Will Below Key Due To Corona Virus, Haldi And Mehndi Ceremony Will Be Held Together On October 29 Revealed Sister Nisha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काजल - गौतमचे वेडिंग प्लानिंग:कोरोनामुळे अगदी साधा असेल काजल अग्रवालचा लग्न सोहळा, 29 ऑक्टोबरला हळद आणि मेहंदीचे विधी एकत्र होतील

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काजल येत्या 30 ऑक्टोबरला प्रियकर गौतम किचलूसोबत बोहल्यावर चढणार आहे.

साऊथ ते बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी निर्माण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्न करणार आहे. काजल येत्या 30 ऑक्टोबरला प्रियकर गौतम किचलूसोबत बोहल्यावर चढणार आहे. राणा डग्गुबाती- मिहिका बजाज आणि नेहा कक्कर- रोहन प्रीत सिंगच्या लग्नानंतर काजलच्या लग्नाबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. काजलची बहीण निशा अग्रवाल हिने सांगितल्यानुसार, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे काजलचा लग्नसोहळा अतिशय साधा असणार आहे.

  • हळद आणि मेहंदी समारंभ एकत्र असतील

लग्नाच्या तयारी आणि धार्मिक विधींबद्दल बोलताना काजलची बहीण निशाने हैदराबाद टाईम्सशी बोलताना सांगितले की, 'अनेक निर्बंध असूनही आम्ही लग्नाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पारंपरिक हळद आणि मेहंदी समारंभ आम्ही घरीच करू. दोन्ही विधी 29 ऑक्टोबर रोजी लग्नाच्या एक दिवस आधी होणार आहेत.'

  • वडील काजलच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते : निशा

निशा पुढे म्हणाली, माझे वडील बर्‍याच दिवसांपासून काजलच्या लग्नाची वाट पाहत होते. आमच्या कुटुंबासाठी हा काळ अतिशय खास आहे. काजलच्या लग्नामुळे आम्ही जरा भावनिकही झालो आहोत, कारण ती लग्नानंतर घर सोडून जाईल. अशा परिस्थितीत आम्ही तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाला वधूबरोबर वेळ घालवायचा आहे, म्हणून मला तिच्याबरोबर जास्त वेळ मिळाला नाही.

इंटेरियर डिझायनर गौतम किचलू आणि अभिनेत्री काजल अग्रवाल ब-याच काळापासून रिलेशनशिप आहेत. आता 30 ऑक्टोबर रोजी दोघांचे लग्न होणार आहे. गौतमच्या कुटुंबीयांचे स्वागत करण्याबद्दल निशा म्हणाली, "गौतम खूप छान व्यक्ती आहे आणि कुटुंबात त्यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे."