आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठवड्याच्या चर्चांनंतर रूमर्स अखेर खरे ठरले आहेत. सिंघम अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच पहिल्यांदा आई होणार आहे. अभिनेत्रीचे पती गौतम किचलू यांनी एका सुंदर फोटोसह आनंदाची बातमी शेअर केली आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला काजल अग्रवालचा फोटो शेअर करत गौतम किचलूने लिहिले, 'तुझ्याकडे पाहत आहे 2022. या कॅप्शनसह गौतमने गर्भवती महिलेचा इमोजीही शेअर केला आहे. ही पोस्ट समोर येताच लोकांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
काजलने बेबी बम्पसोबतचा फोटो शेअर केला आहे
काजल अग्रवालनेही नवीन वर्षाची सोशल मीडिया पोस्ट शेअर करून बेबी बम्प फ्लॉन्ट केला आहे. फोटोमध्ये, अभिनेत्री हिरव्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसतेय. तर पती गौतम किचलू तिच्या बेबी बम्बसोबत पोज देत आहे. यासोबत अभिनेत्रीने लिहिले की, मी जुन्या शेवटासाठी डोळे बंद केले आहेत आणि नव्या सुरुवातीसाठी माझे डोळे उघडले आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी 2021 साठी खूप आभारी आहे आणि पूर्ण आशा, विनम्रता आणि आपल्या आपल्या मनात प्रेमासह 2022 मध्ये पाऊल टाकत आहे.
दुबईमध्ये व्हॅकेशनवर आहेत कपल
काजल अग्रवाल आणि पती गौतम किचलू सध्या दुबीमध्ये न्यू ईयर व्हॅकेशनवर आहेत. येथे कपलसोबत त्यांच्या कुटुंबातील जवळचे लोकही उपस्थित आहेत.
2020 मध्ये प्रायव्हेट सेरेमनीमध्ये केले होते लदग्न
काजल अग्रवालने ऑक्टोबर 2020 मध्ये गौतम किचलूसोबत मुंबईच्या ताज महल पॅलेसमध्ये लग्न केले होते. या लग्नात कपलचे काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.