आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये तेरा घर ये मेरा घर:काजोलने मुंबईत 11 कोटींचे दोन अपार्टमेंट्स खरेदी केले, या सेलिब्रिटींनीही कोरोनाच्या काळात प्रॉपर्टीमध्ये केली मोठी गुंतवणूक

6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जानेवारीमध्ये काजोलने हे अपार्टमेंट खरेदी केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने नुकतेच मुंबईतील जुहू परिसरात दोन नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. हे नवीन अपार्टमेंट्स काजोल आणि अजय यांच्या शिवशक्ती या घराजवळ असलेल्या अनन्या इमारतीत आहेत. 2000 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या अपार्टमेंटची किंमत 11.95 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारीमध्ये अभिनेत्रीने हे अपार्टमेंट खरेदी केले होते.

 • अजय देवगण- काजोल

2021 मध्ये काजोल आणि अजय देवगणने जुहू परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला होता, ज्याची किंमत 60 कोटी आहे. अजय-काजोलचा हा बंगला 5310 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. हा बंगला काजोल आणि अजयच्या 'शिवशक्ती' बंगल्यापासूनही जवळ आहे.

 • जान्हवी कपूर

जानेवारी 2021 मध्ये जान्हवी कपूरने जुहू येथे एक आलिशान घर विकत घेतले आहे. जान्हवीचे नवीन घर तिसर्‍या मजल्यावर आहे, ज्याची किंमत 39 कोटी सांगितली जात आहे.

 • अर्जुन कपूर

'भूत पोलिस' फेम अभिनेता अर्जुन कपूरने मे 2021 मध्ये नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. वांद्रे येथील या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटची किंमत 20-22 कोटी रुपये आहे. अर्जुनची मैत्रीण मलायका अरोराही याच सोसायटीत राहते.

 • अमिताभ बच्चन

मे 2021 मध्ये, अमिताभ बच्चन यांनी ओशिवरामध्ये एक नवीन डुप्लेक्स विकत घेतला आहे. हे डुप्लेक्स अटलांटिक बिल्डिंगच्या 27व्या आणि 28व्या मजल्यावर आहे. 5700 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या डुप्लेक्सची किंमत 31 कोटी रुपये आहे.

 • सनी लिओनी

अमिताभ बच्चनप्रमाणे सनी लिओनीनेही अटलांटिस इमारतीत फ्लॅट खरेदी केला आहे. एप्रिल 2021 मध्ये सनीने हा फ्लॅट 16 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

 • जॅकलिन फर्नांडिस

फेब्रुवारी 2021 मध्ये, जॅकलिन फर्नांडिसने प्रियांका चोप्राचे जुने घर कर्मयोग विकत घेतले. या घरासाठी जॅकलिनने 7 कोटी रुपये मोजले आहेत.

 • आलिया भट्ट

'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेत्री आलियाने 2020 मध्ये वांद्रे पाली हिल येथील वास्तू बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. 2,460 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या अपार्टमेंटची किंमत 32 कोटी रुपये आहे. आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर याचाही या इमारतीत फ्लॅट आहे.

 • हृतिक रोशन

हृतिक रोशनने 2020 मध्ये जुहू येथील सी फेसिंग अपार्टमेंटनंतर दोन नवीन घरे खरेदी केली आहेत. दोन्ही घरे जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील मन्नत बिल्डिंगच्या 14व्या, 15व्या आणि 16व्या मजल्यावर आहेत. हे अपार्टमेंट 38000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले गेले आहेत, ज्याची किंमत सुमारे 100 कोटी आहे.

 • आयुष्मान खुराणा

आयुष्मान खुराणाने त्याच्या कुटुंबासाठी 2020 मध्ये सेक्टर 6, पंचकुला, चंदीगड येथे घर विकत घेतले आहे. त्यांच्या या घराची किंमत सुमारे 9 कोटी रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...